वाहतुकीला धोका, सुदैवाने जीवित हानी टळली
पेडणे : राष्ट्रीय महामार्गावर महाखाजन धारगळ येथे दरड कोसळल्याने रस्ता वाहतुकीसाठी धोकादायक बनला आहे रस्ता बांधकाम कंपनी एमव्हीआर आणि राष्ट्रीय महामार्ग रस्ता विभागाच्या निष्काळजीपणामुळे असा प्रकार घडत असल्याचा आरोप स्थानिकांडून केला जात आहे. महाखाजन धारागळ येथे यापूर्वी गेल्या वषी अशाच प्रकारच्या मोठ्या प्रमाणात दरड कोसळून या भागात वाहतुकीला सहा महिने अडथळा निर्माण झाला होता. गेल्या दोन दिवसांपासून पावसाने कहर केल्यामुळे रात्रीच्या वेळी दोन वेळा दरड कोसळली. यात भले मोठे दगड रस्त्याच्या बाजूला आले. या ठिकाणी संरक्षण भिंत उभारण्याचा काम सुरू असतानाच हे दरड परत एकदा कोसळले. रात्रीच्यावेळी दरड कोसळल्याने जीवित हानी झाली नाही. मात्र सदर दरडीची माती आणि भले मोठे दगड येथे बांधकाम सुरू असलेल्या संरक्षकभिंतीवर कोसळले. त्यामुळे या संरक्षकभिंतीच्या कामाबाबतही साशंकता व्यक्त होत आहे. दरम्यान, डोंगर कापण्याची पद्धत चुकीची आहे. डोंगराच्या पायथ्याशी असलेली ही भिंत निऊपयोगी ठरली आहे. असा आरोप रोहिदास हारमलकर यांनी केला आहे.









