विवाहांच्या प्री-वेडिंग शूटसाठी जोडपी अनेकदा अत्यंत निसर्गरम्य ठिकाणांची निवड करतात. परंतु तैवानच्या नान्टौ काउंटीमध्ये एका जोडप्याने कचऱ्याच्या भल्यामोठ्या ढिगासमोर प्री-वेडिंग शूट करविले आहे. आइरिस सुएह आणि त्याची होणारी वधू इयान सिलोउ यांनी कचऱ्याच्या ढिगासमोर उभे राहून छायाचित्र करविले आहे. त्यांचे हे प्री-वेडिंग फोटोशूट आता सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरले आहे. या प्री-वेडिंग फोटोशूटचे काही जण कौतुक करत आहेत. तर काही जण या प्री-वेडिंग फोटोशूटला चुकीचे ठरवत आहेत.
या अनोख्या प्री-वेडिंग शूटमुळे विवाह सोहळ्यात सामील होणारे अतिथी हे अनावश्यक स्वरुपात कचरा न फैलाव

ण्याप्रति जागरुक होतील अशी अपेक्षा आहे. पाहुण्यांनी घरातून डबे आणावेत आणि विवाहसोहळ्यात शिल्लक अन्न स्वत:सोबत न्यावे, यामुळे अन्नाची नासाडी होणार नसल्याचे इयानने म्हटले आहे. इयान स्वत:च्या विवाह सोहळ्यात कुठल्याही प्रकारचा कचरा निर्माण होऊ नये म्हणून विशेष खबरदारी घेत आहे.
2.3 कोटी लोकसंख्या असलेल्या तैवानमध्ये 1987 पासून रिसायकलिंग कार्यक्रम सुरू आहे, यात 50 टक्क्यांपेक्षा अधिक कचरा घरातून निघतो. तैवानमध्ये कचऱ्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. यामुळे उपाययोजना करण्याची वेळ आली असल्याचे उद्गार टाउनशिपच्या स्वच्छता दलाचे प्रमुख चेन चुन-हंग यांनी काढले आहेत.









