कैद्यांना मिळते सुटीसारखी अनुभूती
सर्वसाधारणपणे तुरुंग हे कैद्यांना बाहेरील जगाच्या सुविधांपासून दूर एक कठोर जीवन जगायला लावणारी जागा असल्याचे मानले जाते. परंतु युरोपमधील तुरुंग हे एखाद्या फाइव्ह स्टार हॉटेलपेक्षा कमी नसतात. अशाचपैकी एक आहे स्टॉर्स्ट्रोम तुरुंग असून याची छायाचित्रे सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. हा तुरुंग अत्यंत आलिशान आहे.
स्टॉर्स्ट्रोम तुरुंग डेन्मार्कच्या दक्षिण हिस्स्यात असून ते दक्षिण जीलँड बेटावर आहे. जगात हे विशेषकरून आधुनिक आणि आरामदायी सुविधांसाठी प्रसिद्ध आहे. याचमुळे याला एक फाइव्ह स्टार तुरुंगासारखे स्वरुप मिळाले आहे. या तुरुंगात कैद्यांना प्राणीही पाळता येतात आणि शेतीचे कामही करता येते. कैद्यांना रुचकर आणि पौष्टिक भोजन दिले जाते. या तुरुंगाचा मुख्य उद्देश कैद्यांना जबाबदार आणि सशक्त करणे आहे. या तुरुंगातून बाहेर पडल्यावर फारच कमी लोक पुन्हा गुन्हा करतात.
डेन्मार्कच्या स्टॉर्स्ट्रोम तुरुंगाला 250 कैद्यांसाठी डिझाइन करण्यात आले असून याला एक मिनी-कम्युनिटीच्या स्वरुपात तयार करण्यात आले आहे. येथे कैदी सामान्य वातावरणात स्वत:चा वेळ घालवू शकतात, येथील वास्तव्य त्यांना सुधारण्याची आणि समाजात परतण्याची संधी प्रदान करते. या तुरुंगात क्रूर गुन्हेगार कैद असून त्यांच्यावर हत्या, बलात्कार आणि अमली पदार्थांची तस्करीसारखे गंभीर आरोप आहेत. हा तुरुंग त्यांना स्वत:च्या चुका समजण्याची आणि स्वत:च्या जीवनला नवे वळण देण्याची संधी देतो, जेणेकरून तुरुंगातून बहेर पडल्यावर ते डेन्मार्कच्या समाजासाठी चांगले व्यक्ती ठरावेत.
तुरुंगाला डेनिश आर्किटेक्ट सीएफ मोलर यांनी डिझाइन केले असून हे कैद्यांना कठोर जीवन परिस्थितींऐवजी एक आरामदायी आणि सुटीसारखे वातावरण उपलब्ध करते. येथे कैदी आरामात राहु शकतात आणि स्वत:ला सुधारण्यासाठी प्रेरित होतात.
स्टॉर्स्टोम तुरुंगाचा आकार 18 फुटबॉल मैदानांइतका आहे. कैद्यांकडे जिमनॅस्टिक्स, शिक्षण, कलानिर्मिती आणि चर्चमध्ये प्रार्थनेसारखे अनेक संधी असतात. याचबरोबर कैदी स्वत:च्या गरजेची सामग्री दुकानातून खरेदी करू शकतो. या तुरुंगाच्या भिंती उंच नाहीत तसेच येथे शस्त्रसज्ज सुरक्षारक्षक नाही. जर कुणी या तुरुंगातून पळाला तर त्याला परत या तुरुंगात आणण्याची अनुमती दिली जात नाही. येथील कैदी मासेमारी अन् अश्वारोहण करू शकतात आणि टेनिस खेळतात आणि उन्हात सनबाथही घेतात. कैद्यांना पेंटेड लाकडापासून तयार घर दिले जाते. एका घरात अनेक लोक राहत असतात, परंतु प्रत्येकाची खोली वेगवेगळी असते आणि खोल्यांसोबत स्वत:चे किचन देखील उपलब्ध असते.









