
स्वत:चा ध्वज, चलन अन् राजकुमारी
जगातील सर्वात छोट्या देशांचा उल्लेख झाल्यास सॅन मॅरिनो आणि व्हॅटिकन सिटीचे नाव समोर येते. परंतु त्यांच्याहून एक छोटा देश असून तो केवळ 14 किलोमीटरच्या क्षेत्रात वसलेला आहे. या छोट्या देशाचे नाव सेबोर्गो असून त्याचे क्षेत्रफळ एखाद्या गावापेक्षाही कमी आहे. परंतु मागील एक हजार वर्षांपासून याला स्वतंत्र देशाचा दर्जा प्राप्त आहे. हा देश अत्यंत छोटा असल्याने येथे येण्यासाठी पासपोर्टची गरज भासत नाही.
या देशाला एक हजार वर्षांपूर्वीच स्वातंत्र्य मिळाले होते आणि पोपनी याच्या मालकाला राजपुत्र घोषित पेले होते. 1719 मध्ये सेबोर्गोची विक्री झाली होती, परंतु याचा मायक्रोनेशनचा दर्जा कायम राहिला. 1800 साली इटलीचे एकीकरण झाल्यावर लोक या गावाला विसरले. 1960 मध्ये येथील स्थानिक रहिवाशाला सेबोर्गोतील राजेशाही औपचारिक स्वरुपात संपुष्टात आली नसल्याचे कळल्यावर त्याने स्वत:ला प्रिन्स जियोर्जियो प्रथम घोषित केले. पुढील 40 वर्षांमध्ये त्याने येथील राज्यघटना, चलन, स्टॅम्पही तयार केला. 320 लोक असलेल्या या देशात पुढील राजा मार्सेलो झाला. सद्यकाळात सेबोर्गोची राजकन्या नीना आहेत. त्यांची निवड 2019 मध्ये करण्यात आली होती. राजकन्या होण्याविषयी विचार केला नव्हता असे त्यांनी सांगितले आहे. येथील चलन सेबोर्गो लुइगिनो असून ते 499 रुपयांसमान आहे. येथे काही पर्यटक पोहोचत असतात. या गावात अत्यंत सुंदर घरं अन् रेस्टॉरंट्स आहेत. या गावाची लोकसंख्या संध्या 297 इतकी आहे.









