वंदूर :
कोगनोळी टोल नाका येथे कंटेनरला भीषण आग लागली. बुधवारी रात्री नऊच्या सुमारास ही घटना घडली. यामध्ये कोणत्याही प्रकारची जीवितहानी झालेली नाही. कंटेनर निपाणी होऊन पुण्याच्या दिशेने जात होता. तो कोगनोळी टोलनाक्याच्या जवळ आल्यास कंटेनरचे क्लिनर बाजूकडील चाक निकामी झाल्याने ड्रायव्हरच्या प्रसंगावधनाने कंटेनर बंद बुथच्या दिशेने घेतला.
कंटेनरचे चाक निकामी झाल्याने रस्त्याला घर्षण झाल्याने आग निर्माण झाली व कंटेनरने बुथला येऊन जोरात धडकल्याने डिझेल टाकी लिकेज झाली, तसेच कंटेनर एअर कंडिशन असल्याने आगीने रौद्ररूप धारण केले. या एअर कंडिशनमुळे आग आटोक्यात आणण्यास विलंब लागला. कंटेनरचा पुढील भाग आगीत जळून खाक झाला. टोल नाका येथील बुधही यामध्ये जळाला आहे. या घटनेने आसपासचा परिसर त्वरित रिकामा झाला. तेथीलच स्थानिक एका वॉटर टँकरच्या सहाय्याने तरुणांनी आग नियंत्रणात आणण्यास प्रयत्न केला. तसेच कागल येथील अग्निशामक दलानेही आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला.








