प्रतिनिधी/ बेळगाव
मुंबईहून बेळगावमध्ये स्थायिक झालेले व हजारो ध्वनी मुद्रिकांचे संग्राहक विजय नाफडे यांचे दि. 4 ऑक्टोबर रोजी मुंबई येथे निधन झाले. बेळगावमध्ये असताना नाफडे यांनी आपल्या संग्रहातील गीतांचा बेळगावकर रसिकांना विनामूल्य लाभ करून दिला होता. त्यांच्याच पुढाकाराने बेळगावमध्ये रसिक रंजन संस्थेची स्थापनाही झाली होती. त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ सोमवार दि. 23 रोजी संगीत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
विजय नाफडे यांच्या संग्रहातीलच हा कार्यक्रम असून दुपारी 4.30 वाजता साईप्रसाद, मंगेश मनोर अपार्टमेंट, चौथा क्रॉस, भाग्यनगर येथे हा कार्यक्रम होईल. नाफडेंच्या सुहृदांनी उपस्थित राहावे, असे आवाहन नाफडे कुटुंबीयांतर्फे करण्यात आले आहे.