A community oriented initiative of Rotary Club Malvan
रोटरी क्लब मालवण तर्फे मेन्स्ट्रुअल हायजिन मॅनेजमेंट अंतर्गत शालेय मुली व स्त्रियांसाठी कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता . यावेळी ७००० बायोडिग्रेडेबल सॅनिटरी पॅड्सचे वितरण करण्यात आले.या मुलींना सहा महिने पुरतील एवढी पॅड्स क्लब मार्फत पुरविण्यात येणार आहेत.तसेच आरोग्यसेविका व अंगणवाडी सेविका ना मेन्स्ट्रुअल कप चे वाटप करण्यात आले .एका शाळेला नॉनइलेकट्रीक इंसिनेरटर प्रदान करण्यात आला.
यावेळी मालवणचे तहसीलदार श्री अजय पाटणे तसेच मालवण मुख्याधिकारी श्री संतोष जिरगे हे प्रमुख अतिथी म्हणुन उपस्थित होते .
रोटरी क्लबच्या एम एच एम डायरेक्टर डॉ लीना लिमये यांनी कार्यक्रमाचा उद्देश विषद करताना महिलांचे व मुलींचे आरोग्य जपताना पर्यावरण रक्षणाचाहि विचार केला असल्याचे नमूद केले.तसेच कॅशफ्री रॅशफ्री व ट्रॅश फ्री अशा मेन्स्ट्रुअल कपचा जास्तीत जास्त वापर व्हावा असे आवाहन केले.
यावेळी मासिक पाळी विषयी माहिती असलेली पुस्तिका प्रकाशित करण्यात आली .कागदाचा अपव्यय टाळण्यासाठी हि पुस्तिका ई बुकच्या स्वरूपात शाळांसाठी उपलब्ध करण्यात आली .









