अटलांटिक समुद्रातील फ्राइंग पॅन हॉटेल
अटलांकि समुद्रात चार खांबांवर उभारलेले फ्राइंग पॅन हॉटेल अत्यंत सुंदर आहे, परंतु हे हॉटेल अशा लोकांसाठी आहे, ज्यांना उंची आणि सागरी लाटांची भीती वाटत नाही. हॉटेलपर्यंत नौका आणि हेलिकॉप्टरद्वारे पोहोचता येते. या हॉटेलमध्ये राहण्यासाठी एका व्यक्तीला 40 हजार 871 रुपयांचा खर्च करावा लागतो.
पाण्याखाली कॅमेरा सोडण्यात आला असून त्याद्वारे समुद्रातील लाइव्ह फुटेज हॉटेलमध्ये दिसत राहते. टॉवरच्या चहुबाजूला पोहोचण्यासाठी रस्ते तयार करण्यात आले असुन तेथून समुद्राचे सुंदर दृश्य न्याहाळता येते. फ्राइंग पॅन हॉटेल अमेरिकेच्या उत्तर कॅरोलिनाच्या पूर्व किनाऱयापासून 32 मैल (52 किलोमीटर) अंतरावर आहे. हे हॉटेल समुद्रसपाटीपासून 135 फूट (41 मीटर) वर चार खांबांवर उभारण्यात आले आहे.

फ्राइंग पॅन हॉटेल अधिक उंचीला घाबरणाऱया लोकांसाठी नाही. तसेच येथे चेक-इनच्या वेळी स्वागत केले जाणाऱया प्रकारातील हे हॉटेल नाही. येथे पोहोचण्यासाठी तुम्हाला हेलिकॉप्टर किंवा नौकेची मदत घ्यावी लागते. या हॉटेलमध्ये जाण्याचा अर्थ तुम्ही अटलांटिक महासागरामध्ये जात आहेत, येथून तुम्ही सागराच्या अजस्त्र लाटा आणि सूर्यास्त पाहू शकतात.
टॉवरच्या प्लॅटफॉर्मवर दोन मजले असून यातील एका मजल्यावर वास्तव्य सुविधा असून सात बेडरुम, किचन, स्टोअररुम, ऑफिस, मनोरंजन क्षेत्र आणि शौचालयाची सुविधा सामील आहे. तर छतावर हेलिपॅड निर्माण करण्यात आले आहे. येथील किचनमध्ये तुम्ही स्वतः स्वयंपाक करू शकता किंवा हॉटेलच्या शेफला बुक करू शकतात. फ्राइंग पॅन टॉवर जहाजांचा सुरक्षा रक्षक म्हणून विकसित झाला होता, समुद्रातून प्रवास करणाऱया जहाजांना कुठलाही धोका उद्भवल्यास त्वरित मदत मिळावी म्हणून या टॉवरची निर्मिती करण्यात आली होती. परंतु 2010 मध्ये ओक्लाहोमा येथील रिचर्ड नील यांनी याचे स्वरुप बदलण्याचा निर्णय घेतला.









