सर्व ऋतूंसाठी अत्यंत उत्तम स्थळ
स्पेनचे सेटेनिल शहर विशाल दगडांखाली वसलेले आहे. स्पेनमधील या अनोख्या शहरात 3 हजारांहून अधिक लोक राहतात. सेटेनिल डे लास बोडेगासचा इतिहास पाषाणयुगातील आहे. हे ठिकाण पूर्वी मद्यासाठी अत्यंत प्रसिद्ध होते, परंतु आता हे स्वादिष्ट मध अन् बदामांसाठी ओळखले जाते. 12 व्या शतकात इस्लामिक मूर्सकडून हे शहर विकसित करण्यात आले होते. हे शहर दगडांमध्ये निर्माण करण्यात आलेल्या घरांसाठी प्रसिद्ध आहे. स्पेनचे सेटेनिल शहर विशाल दगडांखाली वसलेले आहे. सेटेनिल डे लास बोदेगासच्या मुख्य रस्त्याला ‘कैले क्यूवास डेल सोल’ (सूर्याच्या गुहा) म्हटले जाते. कारण येथे सूर्यकिरणे अत्यंत सुंदर पद्धतीने पोहोचतत असतात. येथे वर लटकत असलेल्या दगडाच्या विशाल स्लॅबखाली या रस्त्याची निर्मिती झाली आहे. हा सुंदर रस्ता विशाल दगड अन् एक आकर्षक नदीदरम्यान अनेक गुहासदृश रेस्टॉरंटचे केंद्र ठरले आहे. येथील दगड छत अन् भिंतींचे काम करण्यासोबत घरांचे तापमान नियंत्रित करण्यास मदत देखील करत असल्याचे सांगण्यात येते. युरोपमधील हे अत्यंत आकर्षक पर्यटन स्थळ मानले जाते. या शहराला भेट देण्यासाठी देशविदेशातून पर्यटक दाखल होत असतात. येथील प्रशासनाने या शहराचे ऐतिहासिक सौंदर्य जपल्याने पर्यटकांची निराशा होत नाही.









