सांबरा प्रतिनिधी : मुतगा येथील शेतकरी शिवाजी कणबरकर यांचा सीमा भागामध्ये अनेक शर्यती गाजवलेला शर्यतीचा नगऱ्या बैलाचा लम्पि स्कीन आजाराने मृत्यू झाला आहे. त्यामुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. मुतगा येथील शेतकरी शिवाजी कणबरकर यांच्याकडे नेहमीच शर्यतीचे बैल असतात. त्यांनी पाच वर्षांपूर्वी होसूर- बैलहोंगल येथून नगऱ्या बैलाला आणले होते. त्यानंतर नागऱ्याने सीमा भागातील 50 हून अधिक शर्यती जिंकुन शर्यत शौकिनांच्या गळ्यातील ताईत बनला होता. मंडोळी, सावगाव ,कडोली, मुतगा, खानापूर ,धारवाड चिरमुरी, कल्लेहोळ, बेळगुंदी आदी गावातील अनेक शर्यती नगऱ्या बैलाने जिंकल्या होत्या. त्याला गेल्या बारा दिवसापासून लम्पि स्किन आजाराची लागण होती, त्याच्यावर उपचारही सुरू होते. मात्र उपचाराचा उपयोग न झाल्याने मंगळवारी रात्री अकरा वाजता त्याची प्राणज्योत मालवली. बुधवारी दुपारी त्याच्यावर मुतगा येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी हजारो शर्यत शौकीन नागरिक उपस्थित होते.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









