पुणे / प्रतिनिधी :
Child sexual abuse पुण्यातील लोहगाव परिसरात एअरफोर्स स्टेशनजवळ कटिंगच्या दुकानात गेलेल्या सात वर्षाच्या मुलावर दुकानदाराने लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी पिडित मुलाच्या वडिलांनी विमानतळ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर आरोपी सज्जन सहेआलम सलमानी (वय-20,रा.लोहगाव,पुणे) या आरोपीस पोलिसांनी अटक केली आहे.
ही घटना सात नोव्हेंबर रोजी घडली असल्याची माहिती पोलिसांनी मंगळवारी दिली आहे. पीडित मुलाचे वडील एअरफोर्स स्टेशन परिसरात काम करत असून, त्यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, घटनेच्या दिवशी त्यांच्या पत्नीने त्यांच्या अल्पवयीन सात वर्षाच्या मुलास केस कापण्यासाठी जवळच्या सलून मध्ये नेले होते. सलून मध्ये केस कापण्यासाठी सोडून त्या कामासाठी घरी परत आल्या. त्यावेळी मुलगा एकटा असल्याचा फायदा घेऊन सलून दुकानदाराने मुलास सलूनमधील आतील खोलीत नेऊन मुलावर लैंगिक अत्याचार केले. याप्रकाराने मुलगा घाबरल्याने त्याने घरी गेल्यानंतर पालकांना संबंधित प्रकार सांगितला आणि ही घटना उघडकीस आली.
अधिक वाचा : हिमाचल प्रदेशात काँग्रेसला खिंडार; 26 बड्या नेत्यांचा भाजपात प्रवेश









