करावे लागणार छोटेसे काम
घरात खाण्याऐवजी बाहेर खाणे पसंत करणारे अनेक लोक आपल्याला दिसून येत असतात. त्यांची ही सवय कधीच त्यांचे भले करू शकत नाही, परंतु एक ऑफर समोर आली असून यामुळे बर्गरप्रेमी सुखावणार आहेत. ही ऑफर तुम्हाला बसल्या ठिकाणी कोट्यावधी रुपये जिंकण्याची संधी देऊ शकते.
फास्टफूडच्या शौकिनांना बर्गर प्रचंड आवडत असतो. जर यामुळे पैसे कमाविण्याची संधी मिळाली तर बर्गरप्रेमी आनंदाने उड्याच मारू लागेल. फास्ट फूड कंपनी देत असलेली ऑफर तुम्ही मान्य केलात तर अमेरिकन बर्गर कंपनीकडून तुम्हाला भरभक्कम रक्कम दिली जाणार आहे.
फ्लोरिडा येथील फास्ट फूड चेन बर्गर किंग स्वत:च्या क्रिएटिव्ह फॅनला एकूण 1 दशलक्ष डॉलर्सचे इनाम देणार आहे. याकरता त्याला कंपनीच्या वॉप्पर सँडविचला स्वत:च्या हिशेबानुसार डिझाइन करावे लागणार आहे. ज्या व्यक्तीच्या डिझाइन करण्यात आलेल्या बर्गरला सर्वाधिक पसंती मिळेल त्याला स्पर्धेचा विजेता मानले जाणार आहे. तसेच त्याला 8 कोटी रुपयांपेक्षा अधिक रकमेचे इनाम प्रदान करण्यात येणार आहे.
या स्पर्धेत भाग घेण्यासंबंधीची माहिती कंपनीच्या वेबसाइटवर देण्यात आली आहे. स्पर्धेत भाग घेण्यासठी संबंधिताचे रॉयल पर्क्स अकौंट असणे आवश्यक आहे. 17 मार्चंपर्यत याकरता अर्ज करता येणार आहे. प्रथम यात एआयद्वारे बर्गरची इमेज तयार केली जाईल, ज्यातून अनेक डिझाइन्सची निवड करण्यात येणार आहे. यात निवडण्यात आलेल्या अंतिम डिझाइनर्सना मियामीमध्ये कंपनीच्या मुख्यालयात बोलाविण्यात येणार आहे. तेथे स्वत:च्या संकल्पनेत बदल करण्याची संधी दिली जाणार आहे.