आगाऊ मांजराचा व्हिडिओ व्हायरल
सध्या सोशल मीडियावर अनेक प्रकारचे व्हिडिओ व्हायरल होत असतात. लोक स्वत:चा बराचसा वेळ इंटरनेटवर व्हिडिओ पाहण्यात घालवत असतात. सोशल मीडियावर व्हायरल होणारे अनेक व्हिडिओ मजेशीर तर काही घाबरविणारे असतात. सध्या एका मांजराचा व्हिडिओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. कॅट लव्हर्स स्वत:च्या मांजराला जीवापाड जपत असतात. मात्र एका खोडकर मांजराचा व्हिडिओ समोर आला असून यात ते चक्क चतुराईने काळ्या रंगाच्या बॅगेतून पैशांचे बंडल चोरत असल्याचे दिसून येते.
खुर्चीवर ठेवलेल्या काळ्या रंगाच्या बॅगेत तोंड घालून मांजर काहीतरी शोधताना व्हिडिओत प्रारंभी दिसून येते. काही वेळाने हे मांजर या बॅगेतून नोटांचे बंडल घेऊन बाहेर पडते. यानंतर मांजर टेबलवरून खाली उतरते आणि नंतर दारातून घराबाहेर पडते. मांजराचे हे कृत्य पाहणाऱ्याला गोंडस वाटत असले तरीही त्याच्या मालकाला धक्का देणारे होते. नोटांचे हे बंडल मांजराच्या मालकाला परत मिळाले की नाही हे मात्र कळू शकलेले नाही. या मांजराचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. ‘हळूच मांजराने स्वत:च्या मालकाच्या बॅगेतून पैसे चोरले’ अशा कॅप्शनसह ‘द पेट कलेक्टिव्ह’ नावाच्या युट्यूब चॅनेलने हा व्हिडिओ पोस्ट केला आहे. नेटकरी या व्हिडिओवर अनेक प्रकारच्या प्रतिक्रिया देत आहेत.









