मालवण/प्रतिनिधी
घराच्या रुमची कौले बाजूला करुन, सदर कौलात हात घालून गृह अतिक्रमण करुन दुखापत करण्याच्या उद्देशाने फिर्यादीच्या अंगावर खाजकुवल्या टाकून पळून गेल्याप्रकरणी युवतीने दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी विनायक ज्ञानेश्वर धुरी, रा. वायरी भुतनाथ, ता. मालवण याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. ही घटना सोमवारी रात्री घडली आहे. याप्रकरणी भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 333 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.
अधिक तपास पोलीस निरीक्षक प्रविण कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली जी. एल. शिंदे करीत आहेत.
Previous Articleवाढत्या उष्म्याने प्रवासी संख्येत घट
Next Article सांडपाणी जाण्यास प्लास्टिक कचरा ठरतोय मारक









