कार्यालयातील मुलीवर बलात्कार : पोलीस उपअधीक्षक जीवबा दळवी यांची माहिती
म्हापसा : गिरी पंचायत कार्यालयात काम करणाऱ्या एका मुलीला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर बलात्कार केल्या प्रकरणी म्हापसा पोलिसांनी गिरी सरपंच सनी नानोडकर याच्यावर लैंगिक अत्याचार प्रकरणी भारतीय दंड संहितेच्या कलम 376 खाली गुन्हा नोंद केला आहे, अशी माहिती पोलीस उपअधीक्षक जीवबा दळवी यांनी पत्रकार परिषदेत दिली. संशयित सनी नानोडकर हा फ्ढरारी असून पोलीस त्याच्या शोधात आहेत. गेल्या मे 2022 ते मे 2023 या कालावधीत सनी याने आपल्याला लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार केला. आता त्याने लग्न करण्यास विरोध दर्शविला असल्याचे सदर मुलीने तक्रारीत म्हटले असल्याचे उपअधीक्षक दळवी यांनी सांगितले. दरम्यान, सनीची पत्नी व भावाने त्या मुलीला यथेच्छ चोप दिल्याने हे प्रकरण पोलिसांपर्यंत पोहचले. पोलिसांत बलात्काराबाबत रितसर तक्रार देण्यात आल्यावर म्हापसा पोलिसांनी गुन्हा नोंद केला असून पोलीस सनी नानोडकरचा शोध घेत आहेत, असे उपअधीक्षक जीवबा दळवी यांनी सांगितले. दरम्यान दोन दिवसांपूर्वी कोलवाळ कारागृहात झालेल्या मारामारी प्रकरणी अद्याप कुणीही पोलीस तक्रार दाखल केली नसल्याचे उपअधिक्षक दळवी यांनी सांगितले.









