मालवण/प्रतिनिधी
मालवण बाजारपेठ येथे गांजा ओढल्याप्रकरणी दोघांवर पोलिसांनी गुन्हा दाखल करत ताब्यात घेतले होते. ही कारवाई दिनांक 6 एप्रिल रोजी रात्री उशिरा करण्यात आली.यात संशयित आरोपी म्हणून चिराग हरीश गावकर (21 वायरी ,मालवण ) आणि युवराज शैलेंद्र चिंदरकर (23, चिवला बिच मालवण) या दोघांना ताब्यात घेतले. याप्रकरणी गुंगीकारक औषधी द्रव्य आणि मनोव्यापारवर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम कलम ८(क),२७ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याची तक्रार पोलीस कर्मचारी महादेव अभिनाथ घागरे यांनी दिली आहे.
अधिक तपास जी. जी माने सपोनी हे करीत आहेत. ही कारवाई पोलिस निरीक्षक प्रविण कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश माने, पोलीस उपनिरीक्षक संदीप खाडे, आनंदा यशवंते, पोलिस अंमलदार महादेव घागरे, शिल्पा धामापूरकर यांनी केली.









