शिराळा : वार्ताहर
येथील वनक्षेत्रपाल कार्यालयामार्फत सागर लक्ष्मण यादव (वय ३६ ,रा . चिकुर्डे ता. वाळवा) याने अवैधरित्या नागाला स्वतःच्या ताब्यात ठेवल्यामुळे त्याच्या विरुध्द वन्यजीव (संरक्षण) कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत माहिती अशी की, वनविभागाला मिळालेल्या बातमीनुसार सागर यादव यांने त्याच्या शेताजवळील शेडमध्ये नागास लपवून ठेवले आहे अशी माहीती मिळाली. उपवनसंरक्षक श्रीमती निता कट्टे, यांनी आपल्या सहकाऱ्यांसह सर्प मित्र सुशिलकुमार गायकवाड यांच्या मदतीने धाड टाकून नागास ताब्यात घेतले. या प्रकरणी सागर यादव यांच्यावर गुन्हा दाखल केलेला आहे. वनविभागामार्फत नागरिकांना आवाहन करण्यात येते की नाग वन्यजीवास बाळगणे, नाग, सापाचा अधिवास उध्दवस्त करणे, नाग, साप पकडणे, डांबुन ठेवणे, खेळ करणे, प्रदर्शन करणे इत्यादी गोष्टींचा अवलंब केल्यास संबंधितांविरुद्ध कायद्यानुसार कार्यवाही करण्यात येईल असे आवाहन केले आहे.