खेड:मुंबई-गोवा महामार्गावरील कशेडी घाटालगतच्या चोळई गावच्या हद्दीत मंगळवारी मध्यरात्रीच्या सुमारास मालवाहू ट्रक उलटून झालेल्या अपघातात ट्रकचे दोन तुकडे झाले. अपघातामुळे काही काळ वाहतूक ठप्प झाली होती.चालक सुनील सोपान वाघमारे हा ट्रक (एम.एच. 43 जे 9855) घेवून गोवा येथून कल्याणच्या दिशेने जात होता. चोळईनजीक चालकाचे नियंत्रण सुटल्याने ट्रक उलटून अक्षरश: दोन तुकडे झाले. अपघातात ट्रकचालक सुदैवाने बचावला आहे. त्याला उपचारासाठी पोलादपूर ग्रामीण रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघाताची माहिती मिळताच पोलादपूरचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत जाधव व सहकारी यांनी घटनास्थळी पोहचून मदतकार्य केले.
Previous Articleहंदिगनूर शिवारात धोकादायक वीजखांब-वीजवाहिन्या
Next Article बांदल सेना शौर्य दिवस गांभीर्याने









