मुजावर गल्ली येथील घटना
प्रतिनिधी/ बेळगाव
मुजावर गल्ली येथे रस्त्याशेजारी उभ्या करण्यात आलेल्या कारला आग लागली आहे. सोमवारी पहाटे 4.45 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली असून खडेबाजार पोलीस स्थानकात घटनेची नोंद झाली आहे. यासंबंधी मुतगा येथील सुनील चौगुले यांनी फिर्याद दिली आहे. मुजावर गल्ली येथे त्यांनी जीए 03 सी 8062 क्रमांकाची कार रस्त्याशेजारी उभी केली होती. पहाटे 4.45 वाजण्याच्या सुमारास कारला आग लागल्याचे दिसून आले. स्थानिक नागरिकांनी अग्निशमन दलाला या घटनेची माहिती दिली.
अग्निशमन दलाचे जवान बंबासह घटनास्थळी दाखल झाले. पाणी मारून आग विझविण्यात आली. कार संपूर्ण जळून खाक झाली आहे. कारमुळे शेजारच्या कचऱ्यानेही पेट घेतला. या घटनेचे निश्चित कारण समजू शकले नाही. खडेबाजारचे पोलीस निरीक्षक श्रीशैल गाभी पुढील तपास करीत आहेत.









