वार्ताहर /कामुर्ली
मारुती स्विफ्ट कारची (जीए-03-वाय-9924) थिवी पंचायत समोरील वीजखांबाला धडक बसून अपघत झाली. या धडकेत वीजखांब तुटला व कारच्या दर्शनी भागाचे नुकसान झाले. ही घटना शुक्रवार दि. 13 रोजी सकाळी घडली. संध्याकाळी 6 वाजेपर्यंत नवीन वीजखांब उभारून वीजपुरवठा पूर्ववत करण्यात आला.









