पोलिसांच्या कारवाईत चालक ठार
वृत्तसंस्था / सॅन फ्रान्सिस्को
अमेरिकेच्या सॅन फ्रान्सिस्को येथील चिनी वाणिज्यदूतावासात सोमवारी एक भरधाव कार शिरल्याने खळबळ उडाली. तेथील पोलिसांनी कारच्या चालकावर गोळी झाडल्याने तो मारला गेला आहे. चिनी दूतावासाच्या इमारतीला एक कार धडकल्याची माहिती मिळाली होती यानंतर पोलिसांनी कारवाई करत चालकावर गोळी झाडली होती. या चालकाचा रुग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
आरोपीने कार चिनी वाणिज्य दूतावासाच्या लॉबीमध्ये कार घुसविली होती. या कारने प्रथम चीनच्या व्हिसा कार्यालयाच्या दरवाजाला धडक दिली. या घटनेवेळी दूतावासात अनेक लोक उपस्थित होते. या घटनेत अन्य कुणीच जखमी झालेला नाही. पोलिसांनी या घटनेनंतर परिसराला घेरून तपास सुरू केली आहे. तर आरोपी कारचालकाची अद्याप ओळख पटू शकलेली नाही. तर चिनी दूतावासाने या घटनेला हल्ला ठरवत विस्तृत चौकशीची मागणी केली आहे.









