घरातून चावी घेत रस्त्यावर चालविली कार
एका चार वर्षीय मुलला घरातून कारची चावी मिळवितो आणि मग त्या चावीने कार स्टार्ट करून ड्राइव्ह करत निघून जातो. हे सर्व तू कसे केलेस असे पोलिसांनी विचारल्यावर तो पूर्ण आत्मविश्वासाने कशाप्रकारे कार स्टार्ट केली हे सांगतो. ही बाब वाचायला अविश्वसनीय वाटली तरीही हेच सत्य आहे. नेदरलँडमध्ये ही घटना घडली आहे.
हा चार वर्षीय मुलगा अनवाणी पायांनी आणि नाइट पँटमध्येच कार चालविण्यासाठी निघाला. यादरम्यान रस्त्यावरून जता असलेल्या लोकांनी इमर्जन्स सर्व्हिसला फोन करत याची कल्पना दिली. या पूर्ण प्रकरणाला नॉर्थ उट्रेच पोलीस फोर्सने इन्स्टाग्रामवर शेअर केले आहे. या मुलाची नंतर वैद्यकीय तपासणी करण्यात आली. मुलगा एकट आणि अनवाणी पायांनी सापडल्यावर रुग्णवाहिकेच्या सदस्यांना परिसरात मुलाचे वडिल नसल्याने त्यांनी त्याला पोलीस स्थानकात नेले होते, जेथे त्याला हॉट चॉकलेट देण्यात आले.

एक कार देखली परिसरात कुणी तरी सोडून गेल्याचे काही वेळाने पोलिसांना कळले. ही कार पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या वाहनांना धडकली होती. त्यानंतर पोलिसांनी कारच्या नोंदणीकृत मालकाला फोन केल्यावर त्यांना ती 4 वर्षीय मुलाची आई असल्याचे समजले.
काहीतरी नवे करण्याची इच्छा
माझा मुलगा नेहमीच काही न काही नवे करण्याचा प्रयत्न करतो असे त्याच्या आईने पोलिसांना सांगितले. तसेच फोनवरून स्वतःच्या मुलाशी त्यांना संभाषण केले. यादरम्यान तो स्वतःच्या हाताने स्टेयरिंग फिरविण्याची नक्कल करण्याचा प्रयत्न करत होता. यामुळे त्यानेच कार चालविली असेल असा संशय पोलिसांना आला.
त्यानंतर पोलिसांनी मुलाच्या आईला कारनजीक नेले, तेथे त्याचे वडिलही पोहोचले. ही कार कशाप्रकारे चालविता येते असे पोलिसांनी मुलाला विचारल्यावर त्याने आपण कशी कार चालविली याचे प्रात्यक्षिकच करून दाखविले. हा प्रकार पाहून ही करामत या मुलाचीच असल्याची जाणीव झाली.









