चालक जखमी, कारमधील सुदैवाने चौघेही बचावले
पेडणे : राष्ट्रीय महामार्गाचा अंदाज न आल्याने राष्ट्रीय महामार्ग 66वर मालपे येथे रस्त्याचा अंदाज न आल्याने रविवारी पहाटे एका कारचा अपघात झाला. त्यानंतर कारने पेट घेतल्याची घटना घडली आहे. मालपे येथे ही घटना घडली, मात्र सुदैवाने कारमधील चौघे जण बचावले. यासंबंधीचे वृत्त असे की, कोलवा येथून आलेल्या एका होंडा सिव्हीक कारचा (जीए 08 एम 2586) मालपे चढणीवर बगल मार्गाजवळ अपघात झाला. या स्वयं अपघातानंतर कारला आग लागली. यामध्ये कारचालक साहिल शेट्टी हा जखमी झाला आहे. या कारमध्ये पती, पत्नी व दोन मुले होती. त्यांना किरकोळ दुखापत झाली आहे. अपघातानंतर तातडीने जखमी चालक शेट्टी याला गोवा मेडिकल कॉलेज हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी नेण्यात आले. रस्त्यावर मातीचे ढिगारे ठेवल्यामुळे ते अपघाताला कारणीभूत ठरले.
सीएनजी गॅसमुळे घेतला पेट ?
अपघातानंतर गाडीतील चारही व्यक्ती सुखरूप बाहेर पडल्या नंतर काही वेळाने गाडीने पेट घेतला. या कारमध्ये सीएनजी गॅस वापरला जात होता. त्यामुळे कारने पेट घेतला असेल, अशी शक्मयता पेडणे पोलीस निरीक्षक सचिन लोकरे यांनी व्यक्त केली. राष्ट्रीय महामार्गावर अत्यंत धोकादायक आणि ख•sमय बनलेल्या रस्त्यामुळे सतत छोटे-मोठे अपघात होत असतात. त्यामध्ये मृत्यू होण्याचे प्रमाणही वाढले आहे. पेडणे तालुक्मयात अपघात सुरूच असल्याचे दिसून येते. महाखाजन ते पत्रादेवी येथे राष्ट्रीय महामार्गावर वारंवार अपघात होत असतात. कंत्राटदाराच्या मनमानी कारभारामुळे आतापर्यंत अनेकांचे बळी या रस्त्यावर गेले आहे. नागरिकांनी अनेकवेळा मागणी कऊनही सरकारला जाग येत नाही.









