कणकवली : वार्ताहर
पोलीस बंदोबस्तात मोहीम सुरु
महामार्ग प्राधिकरणचे अधिकारी उपस्थित
A campaign to remove unauthorized stalls under the flyover has started in Kankavli
यापूर्वी दिलेल्या सूचनेप्रमाणे महामार्ग प्राधिकरणतर्फे कणकवली शहरातील फ्लाओव्हर ब्रिजखाली असलेले अनधिकृत स्टॉल हटविण्याची मोहीम अखेर शुक्रवारी सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास सुरू करण्यात आली. यावेळी स्टाॅलधारकांचा विरोध होण्याची शक्यता असल्याने, कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. पोलीस उपनिरीक्षक अनिल हाडळ, बापू खरात घटनास्थळी उपस्थित होते. यावेळी महामार्ग प्राधिकरणचे उपअभियंता महेश फटी, कनिष्ठ अभियंता एम. आर. साळुंखे, रुपेश कांबळे आदीही उपस्थित होते.
येथील नरडवे चौक येथून अतिक्रमण हटाव मोहिमेला प्रारंभ करण्यात आला. जे स्टॉलधारक आपला स्टॉल स्वतःहून बाजूला घेऊ इच्छित होते. त्यांना वेळ दिला जात आहे. तर जे स्टॉलधारक विरोध करत आहेत, त्यांचे स्टॉल हटविण्यास सुरुवात करण्यात आली आहे. दरम्यान आपली रोजीरोटी असणार स्टाॅल हटवताना पाहून स्टाॅलधारकांच्या डोळ्यांमध्ये अश्रूही दिसून येत आहेत.









