ब्रिटनमधील एक महिला, जिचे सोशल मिडियावरील नाव ‘शेल एक्प्लोअर्स युके’ असे आहे, तिने आपल्याच देशातील निर्मनुष्य स्थानी एका अलिशान बंगल्याचा शोध लावला आहे. या वास्तूची किंमत किमान 35 कोटी रुपये असून त्यात सर्व साधने, सुखसोयी आणि सुविधा आजही जशाच्या तशा आहेत. गॅरेजमध्ये महागडी जॅग्वार कारही आहे. असा हा प्रासाद रिकामा कसा असा प्रश्न पडणे स्वाभाविक आहे. या प्रासादात 2014 पर्यंत एक धनाढ्या तेल गुंतवणूकदार आपल्या मैत्रिणीसह रहात होता. त्यांना एक कन्याही होती. नंतर या धनिकाचे अन्य महिलेवर प्रेम जडल्यानंतर याने हा बंगला सोडला आणि तो अन्य बंगल्यात वास्तव्यास गेला. नंतर त्याच्या मैत्रिणीनेही हे स्थान सोडल्याने ते गेली अनेक वर्षे रिकामेच पडून आहे. त्याच्या आजूबाजूला मोठी झाडे वाढल्याने ते कोणाला सहजगत्या दिसतही नाही. या महिलेला अशा वास्तू शोधण्याचा छंद असल्याने तिने तो शोधला आणि त्याची माहिती समाजमाध्यमावर प्रसिद्ध केली.
या प्रासादात महागड्या वस्तू तर आहेतच. पण त्याहीपेक्षा अधिक महत्वाच्या दुर्मिळ वस्तू या महिलेला आढळून आल्या आहेत. या वस्तूंमध्ये या वास्तूच्या मूळ मालकाची त्याच्या पहिल्या कुटुंबासमवेतची अनेक छायाचित्रे आहेत. त्याच्यासह त्याच्या कुटुंबाचे धातूछायाचित्रही या महिलेला तेथे सापडले. एवढी महाग वास्तू इतके दिवस दुर्लक्षित आणि आणि अशा प्रकारे रिकामी कशी राहू शकते, याचे आपल्याला आश्चर्य वाटल्याशिवाय रहाणार नाही. पण ब्रिटनमध्ये अशा अनेक वास्तू असून त्यांच्याकडे कोणाचेही लक्ष नाही, अशी स्थिती असल्याचे बोलले जाते.









