सेन्सेक्स 18 तर निफ्टी 33 अंकांनी वधारले : अदानी 13 टक्क्यांनी तेजीत
वृत्तसंस्था/ मुंबई
सलगपणे दोन सत्राच्या दरम्यान भारतीय भांडवली बाजारात तेजीची नोंद करण्यात आली आहे. यामध्ये मंगळवारी काहीशा दबावासोबत सेन्सेक्स व निफ्टी यांचे समभाग काहीशा तेजीसोबत बंद झाले आहेत. मंगळवारच्या सत्रात अदानी समुहातील सर्व 10 समभाग सलगपणे तेजी प्राप्त करत बंद झाले आहेत. अदानीच्या समभागांनी 13 टक्क्यांची वाढ नेंदवली आहे. तसेच डीएलएफ, एचसीएल टेक, टेक महिंद्रा, कोटक बँकेचे समभाग हे घसरणीसोबत बंद झाले.
मंगळवारी जागतिक पातळीवरील मिळताजुळता कल राहिल्याच्या यामध्ये दिवसभरातील कामगिरीत बीएसई सेन्सेक्स 18.11 अंकांनी वधारुन निर्देशांक 0.29 टक्क्यांच्या मजबूतीसोबत 61,981.79 वर बंद झाला आहे. यासोबतच निफ्टी 33.60 अंकांनी वधारुन निर्देशांक 18,348.00 वर बंद झाला.
प्रमुख समभागांमध्ये 30 पैकी 17 समभाग हे घसरणीसोबत बंद झाले, तर 13 समभाग हे तेजीच्या प्रवासासोबत बंद झाले आहेत. यामध्ये 4 समभाग हे 1 टक्क्यांच्या मजबूतीत राहिले आहेत. अदानी समूहातील समभागाने सलग दुसऱ्या दिवशी तेजी नेंदवली आहे. यामध्ये अदानी एंटरप्राईजेसचे समभाग हे 307.60 रुपयांनी म्हणजे 13.22 टक्क्यांनी वधारले आहेत. तसेच वरोक इंजिनिअरिंगचे समभाग 6.06 टक्क्यांनी वधारले. तर टेलीकॉम क्षेत्रातील कंपनी आयटीसी लिमिटेडचे समभाग हे 4.05 टक्क्यांच्या तेजीत राहिले असून टाटा मोर्ट्स, बजाज फिनसर्व्ह, आयटीसी, एशियन पेन्ट्सचे समभाग 1 टक्क्यांपेक्षा अधिकने तेजीत राहिले.
अन्य कंपन्यांमध्ये मंगळवारी डीएलएफचे समभाग हे 2.50 टक्क्यांनी प्रभावीत झाले आहेत. तसेच ओमॅक्स लिमिटेडचे समभाग हे 2.31 टक्क्यांनी घसरले आहेत. तसेच नेस्को लिमिटेडचे समभाग हे 1.84 टक्क्यांनी नुकसानीत राहिले. तसेच एचसीएल टेक, टेक महिंद्रा, कोटक बँकेचे समभाग हे 1 टक्क्यांपेक्षा अधिकने नुकसानीत राहिले.









