डेट्रायट शहरातील धक्कादायक घटना
वृत्तसंस्था/ डेट्रॉयट
इस्रायल-हमास युद्धाचा प्रभाव अमेरिकेतही दिसून येऊ लागला आहे. अमेरिकेच्या मिशिगन प्रांतातील सर्वात मोठे शहर डेट्रायटमध्ये घडलेली घटना याचे नवे उदाहरण आहे. डेट्रायट सिनेगॉगच्या अध्यक्षाची त्यांच्या घराबाहेर चाकूने वार करत हत्या करण्यात आली आहे. पोलिसांना अद्याप या हत्येमागील उद्देश शोधून काढता आलेला नाही. मृत महिलेचे नाव समांथा वोल आहे. शहराचे महापौर माइक डुग्गन यांनी या हत्येच्या घटनेची पुष्टी दिली आहे.
40 वर्षीय वोल यांनी 2022 पासून इसहाक एग्री डाउनटाउन सिनेगॉगचे नेतृत्व केले होते. तसेच त्या डेमोक्रेटिक प्रतिनिधी एलिसा स्लोटकिन यांच्या माजी सहकारी आणि अॅटर्नी जनरल डाना नेसेल यांच्या कॅम्पेनमध्ये देखील सामील राहिल्या होत्या. समांथा वोल या ज्यू धर्मीय होत्या. याचमुळे त्यांच्या हत्येला हमाससोबत सुरु असलेल्या युद्धाशी जोडून पाहिले जात आहे.
वोल यांच्या हत्येनंतर ज्यूधर्मीयांमध्ये शोक पसरला आहे. या हत्येची माहिती कळताच हादरून गेले आहे. वोल माझ्यासाठी काम करायच्या. वोल यांनी माझे कार्यालय स्थापन करण्यापासून माझ्या पहिल्या कार्यकाळासाठी याचे नेतृत्व करण्यात महत्त्वाचे योगदान दिले होते असे अमेरिकेच्या प्रतिनिधिगृहाच्या सदस्य एलिसा स्लोटकिन यांनी सांगितले आहे.









