अस्वलाच्या हल्ल्यातून पती-दिराला वाचविले : हावेरी जिल्ह्यातील घटना : गावकऱ्यांकडून कौतुक
बेंगळूर : अस्वलाने हल्ला केल्यानंतर एका महिलेने एकाकी झुंज देत आपल्या पती आणि दिराला वाचवून मोठे धैर्य दाखविले आहे. शेताकडे जाणाऱ्या आपल्या कुटुंबातील दोघांवर अस्वलाने हल्ला केल्याचे पाहून सबिना नामक महिलेने प्रसंगावधान राखत अस्वलावर लोखंडी रॉडने वार केले. लोखंडी रॉड वर्मी बसल्याने जायबंदी झालेल्या अस्वलाने सबिनावरही हल्ल्याचा प्रयत्न केला. मात्र, तिने पुन्हा यशस्वी प्रतिकार करताच अस्वलाने पळ काढला. महिलेचे हे धाडस पाहून गावकऱ्यांनी तिचे कौतुक केले. हावेरी जिल्ह्याच्या शिग्गावी तालुक्मयातील बसनकट्टी गावात अस्वलाने हल्ला केल्याची ही घटना घडली. अस्वलाच्या हल्ल्यात जखमी झालेल्या दोघांनाही सध्या ऊग्णालयात दाखल केले आहे. बसीर साब आणि रझाक अशी जखमींची नावे आहेत. हे दोघे शेताकडे जात असताना अस्वलाने दोघांवर अचानक हल्ला केला. यावेळी पती बसीर साब याच्या डोक्मयावर तोंड लावून बसलेल्या अस्वलापासून वाचविण्यासाठी धावलेल्या पत्नी सबिनाने एकाकी झुंज दिली. सुरुवातीला सबिनाने अस्वलाच्या डोक्मयावर लोखंडी रॉडने वार केले. दरम्यान, अस्वलाने सबीनावरही हल्ला करण्याचा प्रयत्न केला असता तिने पुन्हा अस्वलावर हल्ला केल्यानंतर त्याने तेथून पलायन केले. तसेच या घटनेत जखमी झालेल्या पती व दिराला हुबळी येथील किम्समध्ये दाखल करून उपचार करण्यात येत आहेत. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली आहे. या घटनेबाबत शिग्गाव पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. दरम्यान, या घटनेत अस्वलाचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. जखमींवर हुबळी येथील किम्स ऊग्णालयात उपचार सुरू असून दोघांची प्रकृती धोक्मयाबाहेर आहे. तसेच अस्वलावर हल्ला केलेल्या सबिनाच्या डोक्मयालाही मार लागला असून तिच्यावरही उपचार करण्यात येत आहेत.
…असा दिला लढा! : सबिना
शेतात जात असताना पती व दिरावर अस्वलाने अचानक हल्ला केला. यावेळी दोघांच्या रक्षणासाठी मी पुढे आल्यानंतर अस्वलाने माझ्यावरही हल्ला केला. मात्र, मी त्याची पर्वा न करता अस्वलाशी लढा देऊन पती आणि दिराचे प्राण वाचवले.









