फॅशन रिटेलिंग कंपन्यांचे उत्पन्न अवघ्या 9 महिन्यात 55 टक्क्यांनी वधारले
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
फॅशन इंडस्ट्री काही महिन्यांपासून तेजीत आहे. फॅशन रिटेलिंग कंपन्यांची विक्री हे सूचित करते. चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या नऊ महिन्यांत फॅशन रिटेलिंग कंपन्यांच्या उत्पन्नात सुमारे 55टक्के इतकी वाढ झाली आहे. सणांमुळे ऑक्टोबर-डिसेंबर तिमाहीत जोरदार विक्री ही मुख्यत्वे होते. या उद्योगातील तज्ञांचा असा विश्वास आहे की जानेवारी-मार्चमध्ये विक्री थोडी कमी असेल, परंतु संपूर्ण आर्थिक वर्ष 2022-23 मध्ये फॅशन रिटेलर्सच्या विक्रीत 45 टक्के वाढ होण्याची अपेक्षा आहे.
रेटिंग एजन्सी आयसीआरएने आपल्या अहवालात म्हटले आहे की, ‘महामारीनंतर आर्थिक घडामोडींनी वेग घेतला आहे. लोकांनी ब्रँडेड कपड्यांवर जास्त खर्च केला. एप्रिल-डिसेंबर 2022 दरम्यान फॅशन रिटेल क्षेत्राच्या उत्पन्नात 55 टक्के वाढीची नेंद केली आहे. प्री-कोविड अर्थात आर्थिक वर्ष 2019-20 च्या पहिल्या 9 महिन्यांतील उत्पन्नापेक्षा 35 टक्के अधिक आहे. 2019-20 आणि 2021-22 दरम्यान सुमारे 50 लाख चौरस फूट व्यापलेली अतिरिक्त स्टोअर्स उघडण्यात आल्याने याचा फॅशन रिटेल क्षेत्राला लाभ उठवता आला.
खर्च वाढल्यामुळे मार्जिन 7-7.3 टक्केपर्यंत कमी होण्याची अपेक्षा आहे साक्षी सुनेजा, उपाध्यक्ष आणि सेक्टर हेड (कॉर्पोरेट रेटिंग), इक्रा यांनी सांगितले की, फॅशन रिटेलर्स कच्च्या मालाच्या वाढत्या खर्चाचा बोजा ग्राहकांवर टाकत आहेत. एप्रिल-डिसेंबर 2022 मध्ये त्यांचे एकूण मार्जिन 2021-22 सारखेच आहे. भाडे, कर्मचारी खर्च आणि जाहिरात खर्च वाढला आहे. यामुळे, उत्पन्नात झपाट्याने वाढ होऊनही फॅशन रिटेलर्सचे ऑपरेटिंग प्रॉफिट मार्जिन 2022-23 मध्ये 7-7.3 टक्के राहण्याची अपेक्षा आहे.








