वृत्तसंस्था/ पॅरिस
फ्रान्सची राजधानी पॅरिसमधील आयफेल टॉवरमध्ये शनिवारी बॉम्ब असल्याची बातमी मिळाल्यानंतर रिकामा करण्यात आला. बॉम्ब निकामी तज्ञांसह पोलीस संपूर्ण परिसरात शोध घेत होते. दुपारी दीडच्या सुमारास तीनही मजले आणि स्मारकाच्या खाली असलेल्या चौकातून सर्वांना हटवण्यात आले. यादरम्यान घटनास्थळी मोठ्या प्रमाणात सुरक्षा कर्मचारी तैनात करण्यात आले होते. विशेष म्हणजे आयफेल टॉवर जगभरात प्रसिद्ध असून फ्रान्समधील पर्यटकांसाठी आकर्षणाचे केंद्र आहे. गेल्यावर्षी 60 लाखांहून अधिक पर्यटक आयफेल टॉवरवर पोहोचले होते.









