ऑनलाईन टीम/तरुण भारत
आसाममधील धुबरी जिल्ह्यात मोठी दुर्घटना घडली आहे. आज ब्रह्मपुत्रा नदी पात्रात जवळपास ३० जणांना घेऊन जाणारी बोट उलटली आहे. यामध्ये अनेकजण यात बुडाल्याची शक्यत वर्तवण्यात येत आहे. घटनास्थळी बचावकार्य सुरू आहे.
घटनास्थळी पोलीसतसेच बचाव पतक शोधमोहिम राबवत आहेत, या घटनेत ६ ते ७ जण अजुनही गायब असून यामध्ये धुबरी विभागीय अधिकारी संजू दासही बेपत्ता असल्याची माहिती, आसाम राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेंद्र देव त्रिपाठी यांनी दिली.
धुबरी-फुलबारी या परिसरातील नागरिक एका छोट्या लाकडी बोटवरुन नदी पार करत होती, यावेळी ती बोट नदीपात्रात पाण्यात आदळली.त्यामुळे ती बोट जाग्यावर पलटली. या बोटमध्ये ३० जण प्रवास करत होते. ज्यांना पोहता येत होते त्यांचा जीव वाचण्यात आला आहे. राज्य आपत्ती प्रतिसाद दल, राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल आणि सीमा सुरक्षा दलाच्या पथकांना शोध आणि बचाव कार्यासाठी तैनात करण्यात आले आहे.
हे ही वाचा : काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीत नवा ट्विस्ट; दिग्विजय सिंह निवडणूक लढवणार