टोकदार शिंगांद्वारे घेतात स्वत:चा जीव
जगात अनेक प्रकारची प्राणी आहेत, प्रत्केक प्राण्याच्या अनेक प्रजाती देखील आहेत. ज्याप्रकारे ठिकाणासाब्sात मानवाचे रंग-रुप बदलते, तसेच प्राण्यांसोबतही घडत असते. कोरड्या ठिकाणी कमी केस असलेले अस्वल दिसून येते, तर हिमाच्छादित प्रदेशात लांब फराने आच्छादलेले अस्वल आढळून येते.

इंडोनेशियाच्या सुलावेसी बेटावर बबीरुसा नाव असलेली डुक्कराची प्रजाती आढळून येते. याला डियर पिग देखील म्हटले जाते. सुलावेसीसोबत हे टोगीजन, सुला आणि बुरु येथेही आढळून येतात. डुकराची ही प्रजाती एका विशेष कारणामुळे ओळखली जाते. या प्रजातीच्या नर डुकरांच्या तोंडातून शिंग बाहेर पडलेले असते. हे शिंग अखेर या डुकराच्या माथ्यालाच टोचते आणि त्याचाच जीव जात असतो.
डुकरांच्या या प्रजातीला स्वत:च्या टोकदार दातांसारख्या शिंगांसाठी ओळखले जाते. नर डुकराच्या तोंडातून दोन लांब दात बाहेरच्या दिशेने आलेले असतात तर दोन छोटे दातही बाहेर पडलेले असतात. लांब टस्क पुढे जाऊन या डुकराच्या खोपडीतच छिद्र करतात. यामुळे या डुकराचा मृत्यू होत असतो. तर दोन छोट्या टस्कचे रहस्य अद्याप सुटलेले नाही. जेव्हा हे डुक्कर लढाई करते, तेव्हा टस्कच्या मदतीने स्वत:चे डोळे अन् तोंडाला वाचवित असल्याचे मानले जाते.
शिकारीवर बंदी
इंडोनेशियात बबीरुसाची शिकार करण्यावर बंदी आहे. या प्राण्याला संरक्षित प्राण्याच्या श्रेणीत समाविष्ट करण्यात आले आहे. तरीही त्यांची शिकार होत आहे. पूर्वी बबीरुसा घनदाट जंगलांमध्ये राहायचे, यामुळे ते मानवी नजरेपासून दूर असायचे. परंतु आता जंगलतोडीमुळे त्यांचा मानवाशी असलेला संपर्क वाढला आहे. यामुळे त्यांच्या शिकारीचे प्रमाण वाढले आहे. परंतु यांची शिकार मांसाकरता होत नाही.









