एफआयआर रद्द करण्याची मागणी फेटाळली : धारगळमधील जमीन हडप केल्याची तक्रार
पणजी ; जमीन हडप-घोटाळा प्रकरणी आपल्यावर नोंद करण्यात आलेली एफ्ढआयआर तक्रार रद्द करण्याच्या मागणीसाठी मांद्रेचे आमदार जीत आरोलकर यांनी सादर केलेली याचिका मुंबई उच्च न्यायालयाने फ्sढटाळून त्यांना मोठा दणका दिला आहे. सरकारने जमीन घोटाळा प्रकरणी नेमलेल्या न्या. व्ही. के. जाधव चौकशी आयोगासमोरही त्यांची सुनावणी घेण्यात आली. आता तेथील पुढील सुनावणी 20 मार्च रोजी निश्चित करण्यात आली आहे. आरोलकर यांच्या याचिकेवर न्यायालयाने सुनावणी पूर्ण करून निकाल राखून ठेवला होता. तो काल बुधवारी जाहीर करण्यात आला. त्यामुळे आमदार जीत आरोलकर यांना मोठी चपराक बसली आहे.
जमीन हडप केल्याची तक्रार
धारगळ पेडणे येथील सुमारे 1,14,500 चौ. मी. जमीन हडप करून त्याचे भूखंड पाडून ते विकण्यात आले, अशी तक्रार आमदार आरोलकर यांच्या विरोधात पेडणे पोलिसांत आली होती. पेडणे पोलिसांनी ती तक्रार जमीन घोटाळा प्रकरणे चौकशीसाठी नेमण्यात आलेल्या एसआयटीकडे वर्ग केली. एसआयटीने एफ्ढआयआर नोंद करून ती तक्रार राज्य सरकारने नेमलेल्या जाधव चौकशी आयोगाकडे सोपवली. आता तेथे आयोगासमोर आरोलकर यांची चौकशी प्रलंबित आहे.
विधानसभेतही आला होता विषय
न्यायालयाने याचिका फ्sढटाळून लावल्यामुळे आरोलकर यांच्या विरोधातील नोंद झालेली एफ्ढआयआर तक्रार कायम राहिली असून त्यांची चौकशी करण्याचा आणि ती पुढे नेण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. आरोलकर यांनी धारगळ येथील जमीन हडप केल्याचा विषय गेल्या अनेक महिन्यांपासून चर्चेत असून राज्य विधानसभा अधिवेशनातही तो आला होता.
हडप केलेली जमीन रवळू खलपांची
पोलिसातील तक्रारीनुसार धारगळ येथील जी जमीन हडप केल्याचा आरोप आरोलकरांच्या विरोधात आहे, त्या जमिनीचे रवळू खलप हे देखील संयुक्त मालक आहेत. त्यांना न सांगता, विश्वासात न घेता सदर जमीन आरोलकर यांनी बळकावल्याचे खलप यांचे म्हणणे आहे. खलप हे परदेशात कॅलिफ्ढाsर्निया येथे वास्तव्य करतात. ते गोव्यात राहत नाहीत, याची संधी साधून ती जमीन हडप करण्यात आली आहे. नोंद झालेली एफ्ढआयआर तक्रार मागे घेण्यात यावी म्हणून आरोलकर यांनी खूप प्रयत्न केले. परंतु ते शक्य झाले नसल्याने त्यांनी न्यायालयात धाव घेतली होती. तेथेही त्यांना दिलासा मिळाला नाही. उलट त्यांची याचिका फ्sढटाळून लावल्यामुळे त्यांना मोठा दणका बसला आहे. शिवाय जाधव चौकशी आयोगासमोर त्यांची चौकशी चालूच राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
घोटाळा प्रकरणातील अनेकांना अटक, जामिन
जमीन घोटाळा प्रकरणात दोन किवा त्यापेक्षा जास्त एफ्ढआयआर तक्रारी नोंद असलेल्यांना न्या. जाधव चौकशी आयोग नोटीस पाठवणार आहे. तसेच दि. 20 मार्चपासून जमीन घोटाळा प्रकरणाची सुनावणी हाती घेण्यात येणार आहे. महंमद सुहेल याच्या विरोधात एकूण 13 एफ्ढआयआर तक्रारी आहेत. एकूण 30 जणांच्या विरोधात 2 किवा त्यापेक्षा जास्त तक्रारी नोंद असून आयोगाकडे आलेल्या 4 तक्रारी जमीन हडप प्रकरणात बसत नसल्याने त्या संबधीत पोलीस स्थानकाकडे परत पाठवण्यात आल्या आहेत. या भानगडीतून अनेकांची नावे पुढे आली असून अनेकांना अटक झाली आहे, तर अनेकजण जामिनावर सुटल्याची माहिती देण्यात आली आहे.









