माजी खासदारासह 10 नेत्यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश
वृत्तसंस्था /नवी दिल्ली
काँग्रेसने तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव (केसीआर) यांचा पक्ष बीआरएसला मोठा झटका दिला आहे. माजी खासदार पोंगुलेटी श्रीनिवास रे•ाr, तेलंगणाचे माजी मंत्री जुपल्ली कृष्णा राव समवेत 10 नेत्यांनी सोमवारी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आणि राहुल गांधी यांच्या उपस्थितीत या नेत्यांनी पक्षाचे सदस्यत्व स्वीकारले आहे. काँग्रेसचे संघटन महासचिव के. सी. वेणुगोपाल, पक्षाचे तेलंगणा प्रभारी माणिकराव ठाकरे आणि तेलंगणा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष रेवंत रे•ाr यावेळी उपस्थित होते. खर्गे आणि राहुल गांधी यांनी काँग्रेस मुख्यालयात तेलंगणा काँग्रेस नेत्यांशी चर्चा देखील केली आहे.
पी. एस. रे•ाr आणि कृष्णा राव यांच्यासोबत माजी आमदार गुरुनाथ रे•ाr, माजी आमदार तसेच वर्तमान जिल्हा परिषद अध्यक्ष कोराम कनकैया, माजी आमदार पायम वेंकटेश्वरलू, अनुसूचित जात महामंडळाचे माजी अध्यक्ष पीदमार्थी रवि, विजया बेबी, थुल्लुरी ब्रम्हैया, बोर्रा राजशेखर आणि एस. जयपाल यांनी काँग्रेसचा झेंडा हाती घेतला आहे. पोंगुलेटी श्रीनिवास रे•ाr हे खम्माम मतदारसंघाचे माजी खासदार आहेत. रे•ाr यांनी वायएसआर काँग्रेसच्या उमेदवारीवर तेथे विजय मिळविला होता. यानंतर ते केसीआर यांच्या पक्षात सामील झाले होते. तर कृष्ण राव हे केसीआर यांच्या सरकारमध्ये ग्रामविकास मंत्री राहिले आहेत. या दोन्ही नेत्यांना काही महिन्यांपूर्वी पक्षविरोधी कारवाया केल्याचा ठपका ठेवत भारत राष्ट्र समितीकडून निलंबित करण्यात आले होते. कर्नाटकातील विजयानंतर काँग्रेसने तेलंगणावर स्वत:चे लक्ष केंद्रीत केले आहे. तेलंगणातील सत्तारुढ बीआरएसच्या अनेक नेत्यांचा काँग्रेसने प्रवेश करविला आहे. यामुळे तेलंगणात आता बीआरएस, भाजप अन् काँग्रेस अशी त्रिकोणी लढत होण्याची शक्यता आहे. तेलंगणात चालू वर्षाच्या अखेरीस विधानसभा निवडणूक होणार आहे.









