4 दिवसात घटणार 3 वर्षांपर्यंतचे वय : उंदरांवरील परीक्षण पूर्ण
हार्वर्ड विद्यापीठाच्या वैज्ञानिकांनी 6 अशा रसायनांचा शोध लावला आहे, जी वृद्ध लोकांना पुन्हा तारुण्य प्राप्त करून देऊ शकतात. एजिंग नियतकालिकात प्रकाशित एक अध्ययन केमिकली इंड्यूस्ड री-प्रोग्रामिंग टू रिव्हर्स सेल्युलर एजिंगमध्ये याचा खुलासा करण्यात आला आहे. या अध्ययनानुसार 6 रसायनांच्या मिश्रणाद्वारे ‘फाउंटेन ऑफ यूथ’ नावाचे औषध तयार केले जाईल, ज्यामुळे वय घटू लागले आणि त्वचा पूर्वीप्रमाणेच चमकदार दिसू लागणार आहे. 6 रसायनांच्या मिश्रणाला केमिकल कॉकटेल संबोधिले जात आहे. वैज्ञानिकांनुसार हे कॉकटेल एका आठवड्यात मानवी त्वचा पेशींमध्ये वय वाढण्याच्या प्रक्रियेला अनेक वषापर्यंत रिव्हर्स करू शकेल. लोक 4 दिवसांच्या ट्रीटमेंटद्वारे अधिक तरुण दिसू शकतात.

अध्ययनाचे नेतृत्व करणारे वैज्ञानिक डेव्हिड सिंक्लेयर यांनी यासंबंधी माहिती दिली आहे. पूर्वी झालेल्या संशोधनात जीन थेरपीद्वारे एंब्रियोटिक जीनला सक्रीय करून वय घटविले जाऊ शकते, असे समोर आले होते. आता नव्या संशोधनात केमिकल कॉकटेलद्वारे हे शक्य असल्याचे आढळून आले आहे. हे पूर्ण शरीराचा कायाकल्प करण्याच्या दिशेने एक यशस्वी पाऊल असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
लवकरच मानवी परीक्षण
हार्वर्ड मेडिकल स्कूलच्या संशोधकांनी हा प्रयोग उंदरांवर केला, याच्या परिणामांमधून सर्व 6 रसायनांद्वारे वय कमी होत असल्याचे आढळून आले आहे. वयात झालेल्या या बदलांना मानवी आणि उंदरांच्या ट्रान्सक्रिप्टोमिक क्लॉकद्वारे ट्रॅक करण्यात आले. हे क्लॉक बायोलॉजिकल एज सांगण्यासाठी जीन एक्सप्रेशन डाटाचा वापर करते. तर या केमिकल कॉकटेलचे मानवी परीक्षण पुढील वर्षी केले जाणार आहे.

फाउंटेन ऑफ यूथ पिल
वैज्ञानिक सिंक्लेयर यांच्यानुसार 6 रसायनांच्या मिश्रणातून तयार होणाऱ्या औषधाने कमजोर दृष्टी सुधारणार आहे. तसेच हे औषध वयाच्या निगडित आजारांशी लढण्यास मदत करणार आहे. प्रत्येक रसायनात 5-7 असे एजंट्स आहेत, जे शारीरिक आणि मानसिक डिसऑडर्स बरे करण्यास सक्षम आहेत. उंदरांच्या ऑप्टिक नर्व्ह, ब्रेन टिश्यू, किडनी आणि स्नायूंवर झालेल्या अध्ययनात या रसायनांमुळे त्यांची दृष्टीक्षमता सुधारल्याचे आणि आयुर्मान वाढल्याचे समोर आले.
वय वाढविणे देखील शक्य
एजिंग रिव्हर्सिबल प्रक्रिया असून ती वाढविली तसेच घटविली जाऊ शकते. पेशी सुस्त पडल्यावर वयात बदल दिसू लागतो असे आतापर्यंत मानले जात होते, परंतु प्रत्यक्षात असे नाही. उंदरांवर झालेल्या प्रयोगात वय घटवून त्याला युवा केले जाऊ शकते असे स्पष्ट दिसून आले. वय केवळ मागे नेता येत नाही तर ते वाढविलेही जाऊ शकते. म्हणजेच कुणालाही वृद्धही करता येऊ शकते. संकल्पनेच्या दृष्टीकोनातून शरीराकडे स्वत:च्या युवावस्थेची बॅकअप कॉपी राहते, या कॉपीला ट्रिगर केल्यास सेल्स रिजनरेट होऊ लागतील अणि वयाचे चक्र उलटे फिरू लागणार आहे. वय वाढणे प्रत्यक्षात पेशींच्या स्वत:च्याच डीएनएला योग्यप्रकारे रीड न करण्याचा परिणाम आहे. यासाठी लोक जेनेटिक म्युटेशन करवितात, ज्यामुळे डीएनए कमजोर पडू लागतात किंवा कमजोर झालेल्या पेशी शरीराला कालौघात कमजोर करतात, यालाच वृद्धत्व म्हटले जाते, असा दावा वैज्ञानिकाने केला.









