स्थानिकांनी पकडून दिले जीवनदान
रत्नागिरी वार्ताहर
दिनांक 24-10-2022 रोजी रत्नागिरीमधील कासवांचे गाव म्हणून ओळख असलेल्या वेळास गावात रात्री 11 वाजण्याच्या सुमारास दरिपकर यांच्या घरा मागे कोंबडीच्या खुराड्याजवळ अजगर असल्याचे दिसून आले. दरिपकर यांनी मोहन उपाध्ये (सहायक संशोधक कांदळवन प्रतिष्ठान, मंडणगड तालुका वनमित्र ) यांना फोनकरून याची माहीती दिली. मोहन उपाध्ये यांनी वनपाल ता. मंडणगड व परीक्षेत्र वनअधिकारी दापोली यांना कळवून अजगरला पकडले.
साधारण ८ ते १०फूट लांब असलेला हा अजगर कोंबड्या खाण्यासाठी आला असल्याचे स्थानिकांनी सांगितले. गोणीत पकडलेल्या अजगरला ग्रामस्थांनी गावच्याबाहेर नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले. वेळास गाव कासवांचे गाव म्हणून ओळखले जातेच परंतु या अजगरला जीवदान देऊन गावकऱ्यांनी त्यांचे पर्यावरणावरील त्यांचे असलेले प्रेम दाखवून दिले आहे.