वार्ताहर / कुडाळ
तेंडोली-भोमवाडी येथील गुंडू तेंडोलकर यांच्या घरानजीक रस्त्याच्या कडेला असलेले काजूचे मोठे झाड गुरुवारी रात्री 10 वाजण्याच्या सुमार रस्त्यावर पडल्याने वाहतूक रात्रभर बंद होती.गेले दोन दिवस मुसळधार पाऊस पडत असून यामुळे ठिकठिकाणी झाडे उन्मळून पडत आहेत. यावेळी या मार्गावर वाहतूक नसल्यामुळे मोठा अनर्थ टळला. मात्र कोणतीही हानी झाली नाही. आज सकाळी स्थानिक ग्रामस्थ व वाहनधारकांच्या मदतीने रस्त्यावर पडलेले झाड मशिनच्या सहाय्याने कापून रस्ता मोकळा करण्यात आला. यावेळी दोन्ही बाजूला वाहतूक खोळंबली होती. वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. बऱ्याच काळानंतर वाहतूक पूर्ववत सुरु झाली









