स्वत:च्या गरजेनुसार निश्चित कालावधी किंवा दिवशी जन्म घेण्याची शक्ती तुमच्याकडे असती तर काय घडले असते? इस्रायलच्या जेरूसलेममध्ये हीब्रू विद्यापीठाच्या संशोधकांनी अशी जैविक प्रक्रिया शोधून काढली आहे, जे हे काम करण्यास सक्षम आहे. याकरता वेगवेगळ्या भ्रूणांचे त्यांनी अध्ययन केले आहे. त्यांनी एक खास प्रकारच्या पर्यावरणीय वातावरणात भ्रूण विकसित करण्याची संधी दिली. स्वत:च्या मर्जीनुसार अपत्यांना जन्म देण्याची शक्ती सर्वसाधारणपणे अनेक माशांमध्ये असते. परंतु जेब्रा फिश या प्रकरणी काहीसा वेगळा आहे. जेब्रा फिशाचे भ्रूण थाइरोट्रॉपिन-रीलिजिंग हॉर्मोन उत्सर्जित करतो. याच्या मदतीने आवश्यक इंजाइम बाहेर पडतात, जे अंड्याच्या आवरणाला वितळविण्याचे काम करतात.
हॅचिंगची प्रक्रिया महत्त्वपूर्ण
हॅचिंग प्रक्रिया यात महत्त्वपूर्ण भूमिका पार पाडते, विशेषकरून माशांच्या जीवनावरून, मासे अनुकूल वातावरणानुसार हॅचिंग करतात. खासकरून जन्माला येणाऱ्या जीवाच्या प्रारंभिक दिवसांमध्ये सर्वाइवलवरून संशय असल्यास हे केले जाते. ते एका रणनीतिच्या अंतर्गत जीवांना जन्म देतात. जेब्रा फिश दिवसाच्या प्रकाशाची प्रतीक्षा करतात. क्लोनफिश आणि हॅलीबट रात्रीची प्रतीक्षा करतात. कॅलिफोर्निया ग्रूनियन मासा तर समुद्राच्या लाटा त्याला आणि अंड्याला वाहून नेण्याची प्रतीक्षा करतो. जेब्रा फिश टीआरएस तेव्हा बाहेर काढते, जेव्हा त्याला जीवाला बाहेरील जगात आणायचे असते. हे हॉर्मोन रक्ताद्वारे हॅचिंग ग्लँड पर्यंत पोहोचते. यामुळे न्यूरल सर्किटला कधी जीवाला जन्म द्यायचा, याचा संदेश मिळतो. हे सर्किट हॅचिंगपूर्वी तयार होते, हॅचिंगनंतर ते समाप्त होते. वैज्ञानिकांनी मेडाका माशांचेही अध्ययन केले आहे. मेडाका आणि जेब्रा फिशच्या उत्पत्तिचा मार्ग 20 कोटी वर्षांपूर्वी वेगळा झाला होता. परंतु दोन्ही टीआरएच रिलीज करतात. परंतु दोघांच्या हॅचिंग ग्लँड्समध्ये याचा प्रभाव वेगळा असतो. त्यांचे इंजाइम वेगळे असतात. त्यांचा भ्रूण विकसित होण्याचा कालावधी वेगळा असतो. परंतु न्यूरल सर्किटमध्ये दोघेही एकाचप्रकारे तयार होते आणि समाप्त होते.









