सांगरूळ :
शिर्डी ते कोल्हापूर असा तब्बल चारशे किलोमीटरचा पायी प्रवास करत धुळे जिह्यातील हेमंत साहेबराव सूर्यवंशी या युवकाने स्वर्गीय आमदार पी एन पाटील यांना श्रद्धांजली वाहिली आहे. पर जिह्यातील या युवकांने आगळ्यावेगळ्या पद्धतीने व्यक्त केलेल्या कृतज्ञतेची संपूर्ण जिल्हाभर चांगलीच चर्चा रंगली आहे.
2019 ला झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीनंतर लगेचच धुळे जिह्यातील काही युवक पोलीस भरतीसाठी मुंबईला गेले होते. यामध्ये धुळे जिह्यातील कापडणे गावातील हेमंत सूर्यवंशी यांचा समावेश होता .खेडेगावातून गेलेल्या या युवकांना मुंबईमध्ये राहण्यासाठी आमदार निवास मधील खोली मिळेल अशी आशा होती .मात्र नुकत्याच निवडणुका झाल्याने त्यांना आमदार निवास मधील खोली मिळाली नाही .याच दरम्यान त्यांना कोणाकडून तरी स्वर्गीय आमदार पी एन पाटील यांच्या स्वीय सहाय्यकांचा मोबाईल नंबर मिळाला .त्यावर संपर्क करत या युवकांनी आपली अडचण त्यांना सांगितली . याची माहिती पी एन पाटील यांना मिळतात तात्काळ त्यांनी त्या युवकांच्या राहण्याची व जेवणाची व्यवस्था केली .
दरम्यान 24 मे 2024 रोजी आमदार पी एन पाटील यांचे झाले .याची माहिती हेमंत सूर्यवंशी यांना ब्रयाच दिवसांनी समजली .स्वर्गीय पाटील यांच्या पुण्यतिथी ची तारीख लक्षात ठेवून या युवकांने 23 मे 2025 रोजी शिर्डी ते कोल्हापूर पायी चालत येऊन पी एन पाटील यांना अभिवादन करण्याचा निर्धार केला . यानुसार 15 मे रोजी शिर्डी येथून पायी चालत निघालेला हा युवक कोल्हापूर मध्ये नऊ दिवसांनी 23 मे रोजी पोहोचला .पाठीवर शाक व त्या शाकवर पी एन पाटील यांचा फोटो व श्रद्धांजली चा मजकूर लावलेले पोस्टर होते .
सायंकाळी आमदार पी एन पाटील यांच्या राजारामपुरी येथील निवासस्थानी पोहोचून या युवकाने पी एन पाटील यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले .जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राहुल पाटील व श्रीपतरावदादा बँकेचे चेअरमन राजेश पाटील यांनी हेमंत सूर्यवंशी यांचे स्वागत केले
- आदर्शवत कृतज्ञता
प्रत्येक नेता आपल्या परीने सामाजिक कार्य करत असतो .त्यामध्ये काही कामे ही निरपेक्ष वृत्तीने केली जातात .तरीही सध्याच्या बदलत्या युगात १०० कामे करून एखाद काम नाही केले तरी रुसणारे व पक्षांतर करणारे कार्यकर्ते याची कमी नाही .पर जिल्ह्यातील असूनही अडचणीच्या वेळी केलेली मदत लक्षात ठेवत आगळ्यावेगळ्या पद्धतीने कृतज्ञता व्यक्त करून हेमंत सूर्यवंशी यांनी अशा लोकांच्या समोर आदर्श ठेवला आहे .
- मी भारावून गेलो
शिर्डीच्या साईबाबा माझे श्रद्धास्थान असल्याने मी तेथून दर्शन घेऊन कोल्हापूरला पायी निघण्यास सुरुवात केली.सातारा सांगली या पश्चिम महाराष्ट्रातील जिल्ह्यात प्रवेश होताच पाठीवर असणारे पी एन पाटील यांचे बॅनर बघून अनेक कार्यकर्त्यांनी विचारपूस करत राहण्याची जेवणाची व्यवस्था केली .पाण्याची बॉटल सुद्धा साधी विकत घ्यावी लागली नाही . अनेकांनी राहुल पाटील यांना शुभेच्छा सांगा माझ्याकडून निरोप दिला .पी एन पाटील यांची जनमानसात असणारी प्रतिमा पाहून मी भारावून गेलो .
हेमंत सूर्यवंशी








