पतिनिधी/रत्नागिरी
तालुक्यातील निरूळ येथे सर्पदंशाने चार वर्षीय बालकाचा मृत्यू झाल़ा ही घटना गुरूवारी सायंकाळी 5 च्या सुमारास घडल़ी वीर पदीप माटल (वय 4, रा. निरूळ, ठोकवाडी) असे मृताचे नाव आहे. या घटनेची नोंद पूर्णगड सागरी पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वीर याचे आई-वडील निरूळ येथे शेतात भातकापणीचे काम करत होते. यावेळी वीर हा देखील शेतात खेळत होता यावेळी विषारी जातीच्या सापाने वीर याच्या पायावर दंश केला. वीर याच्या नातेवाईकांनी त्याला उपचारासाठी जिल्हा शासकीय रूग्णालय येथे दाखल केले. उपचारादरम्यान वीर याचा मृत्यू झाला या प्रकरणी पुढील तपास पोलिसांकडून करण्यात येत आहे.