ढगाळ वातावरणातही बेळगावमध्ये मोठी विमाने लँडीग होणार
बेळगाव : हैद्राबादहून उड्डाण केलेल्या ए-320 या विमाने आज ढगाळ वातावरणातही बेळगावमध्ये सांबरा विमानतळावर यशस्वी लँडीग केले. इन्स्ट्रूमेंटल लँडींग सिस्टीम (आयएलएस) ची यशस्वीरीत्या चाचणी घेण्यात आली. त्यामुळे यापुढील काळात मोठी विमाने ढगाळ वातावरणातही बेळगावमध्ये लँडीग करू शकतात, हे स्पष्ट झाल आहे. इंडिगो कंपनाच्या या विमानाने सकाळी 8.30 वाजता हैद्राबाद येथून उड्डाण केले आणि आज सकाळी 10 वाजता ते बेळगावाच्या सांबरा लँड झाले. विशेष बाब म्हणजे विमान उतरविण्याची सर्व प्रक्रिया ही महिलांनी हाताळली.
यामध्ये कॅप्टन रंजना वेळू, प्रथम अधिकारी आकांक्षा शर्मा, लीड केबीन क्रु कीर्ती अन्वेकर ट्विंकल, थौडुम, श्रीमोइनती यांचा समावेश होता. तर किर्ती अन्वेकर या बेळगावच्या कन्या असून 10 वर्षांपासून इंडीगो एअरलाईन्समध्ये कार्यरत आहेत. 2019 पासून आयएलएस यंत्रणा बेळगाव विमानतळावर कार्यान्वित करण्यो काम सुरू होते. काही दिवसांपूर्वा ही यंत्रणा सुरू करण्यात आली आहे. विमानो लँडींग होताना कोणतीही अडाण येऊ नये, यासाठी ही यंत्रणा काम करत असते.
बेळगाव-हैद्राबाद मार्गावर विमान प्रवाशीं संख्या वाढत असल्याने एअरबस सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. 180 प्रवासी क्षमता असणारी एअरबस 31 जुलैपासून या मार्गावर सेवा देणार आहे. बेळगावहून दिल्लीला जाणारे प्रवासी हैद्राबादमार्गे प्रवास करत असल्याने या विमानफेरीला महत्त्व आले आहे.









