इतिहासातील अनेक रहस्यांची उकल
पुरातत्व तज्ञांनी पश्चिम स्कॉटलंडमध्ये दुसऱया शतकातील एका बेपत्ता रोमन किल्ल्याचा शोध लावला आहे. हा किल्ला म्हणजे पूर्ण ब्रिटनमध्ये स्वतःच्या साम्राज्याचा विस्तार करण्याच्या एका अयशस्वी प्रयत्नाचा हिस्सा होता. हिस्टॉरिक इन्व्हॉयरमेंट स्कॉटलंडनुसार हा किल्ला एंटोनिन वॉलसोबत तयार करण्यात आलेल्या 41 रक्षात्मक संरचनांपैकी एक होता. या किल्ल्याकरता पायाभरणी अन् लाकडी काम झाले हेते, जे पूर्ण स्कॉटलंडमध्ये सुमारे 65 किलोमीटरपर्यंत फैलावलेले होते.
रोमन सम्राट एंटोनिनस पायसने स्वतःपूर्वीचा सम्राट हॅड्रियनला मागे टाकण्याच्या अपेक्षेपोटी ईसवी सन 142 साली भिंत निर्माण करण्याचा आदेश दिला होता. हॅड्रियनने सुमारे 20 वर्षांपूर्वी दक्षिण दिशेला 160 किलोमीटर अंतरावर तटबंदी केली होती. या तटबंदीला हॅड्रियन वॉल म्हणून ओळखले जाते. 20 वर्षांनी रोमनांनी एंटोनिनच्या भिंतीचे काम सोडून देत हॅड्रियन वॉलवर लक्ष केंद्रीत केले होते.

एंटोनिनस पायस एक अधिकारी होता, त्याच्याकडे सैन्याचा कुठलाच अनुभव नव्हता. तो एका विजयाच्या शोधात होता, जो त्याला विदेशी कॅलेडोनियन लोकांच्या विरोधात मिळण्याची अपेक्षा होती. एंटोनिनस पायसने स्वतःच्या शासनाला योग्य ठरविण्यासाठी स्कॉटलंडरवरील स्वतःच्या विजयाचा वापर केला होता असे इतिहासकार आणि पुरातत्व तज्ञ जॉन रीड यांनी सांगितले आहे.
एचईएसच्या पुरातत्वतज्ञांना ग्लासगोच्या बाहेरील भागात एका शाळेनजीक छोटा किल्ला किंवा फोर्टलेटचे मातीत गाडले गेलेले अवशेष सापडले ओत. 1707 मध्ये एका पुरातत्व तज्ञाने या संरचनेचा उल्लेख केला होता. 1970 आणि 1980 च्या दशकात याचा शोध घेण्याचा प्रयत्न करण्यात आला होता, परंतु त्यात यश आले नव्हते.
किल्ल्यात दगडी प्राचीराने घेरले गेलेल्या दोन छोटय़ा लाकडी इमारती आणि 6.5 फूट उंचीचे टर्फ सामील होते. एंटोनिन भिंतीच्या दक्षिण दिशेला याची निर्मिती करण्यात आली होती. प्राचीरमध्ये विरुद्ध दिशांमध्ये गेटवर दोन लाकडी टॉवर होते, ज्याद्वारे लोक, प्राणी आणि वाहने ये-जा करू शकत होती.
पुरातत्वतज्ञांनी जमिनीतील संरचनांचा शोध घेण्यासाठी ग्रेडियोमेट्रीचा वापर केला आहे. हे एक जियोफिजिकल तंत्रज्ञान असून ते पृथ्वीच्या चुंबकीय क्षेत्रातील छोटे बदल टिपते.









