सावंतवाडी प्रतिनिधी
येथील खासकीलवाडा सध्या (रा-मुंबई) प्रणव अर्जुन वारंग वय- 26 वर्ष यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. मुंबई बोरवली येथे तो राहत होता . कामावर जात असताना रेल्वेमध्ये अचानक त्याच्या छातीत दुखू लागल्याने त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले असता उपचार सुरू असताना त्याचे निधन झाले. त्याच्यावर बोरवली येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. शांत, मनमिळावू , हुशार व सर्वांशी मिळून मिसळून वागणारा अशी त्याची ओळख होती. त्याच्या अकस्मित जाण्याने हळहळ व्यक्त होत आहे. त्याच्या पश्चात वडील ,आई, आजी, काका ,काकी, आत्ते, मामा भाऊ-बहीण असा मोठा परिवार आहे. सावंतवाडी येथील रिक्षाचालक यतीन वारंग यांचा तो पुतण्या होय.









