Farmer Suicide : परतीच्या पावसाने सोयाबीन पिकाचे नुकसान झाले. त्यातच खासगी फायनान्सचं घेतलेलं कर्ज फेडायचे कसे या विवंचनेतून २४ वर्षांच्या तरुण शेतकऱ्याने आत्महत्या केली.परभणी जिल्ह्यातल्या कौसडी इथला हा शेतकरी असून गुलाब जीवने असं त्याचं नाव आहे.
यंदा महाराष्ट्रासह देशातील अनेक राज्यात परतीच्या पावसाने थैमान घातलं आहे.या पावसामुळे मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांचं नुकसान झालं आहे. नुसकान झालेल्या पिकासमवेत अनेक शेतकऱ्यांनी सोशल मिडियावर व्हिडिओ शेअर केले आहेत. त्यातच आज एका तरूणाने आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, गुलाब जीवने हे परभणी जिल्ह्यातील कौसडी इथं राहत होते.आज सकाळी त्याने विषारी औषध प्राशन केलं. त्याला रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला.त्याच्यावर लहान भावाची आणि आईची जबाबदारी होती.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव








