ब्रिटनच्या नॉटिंगम येथील प्रकार
एका मुलीला स्वत:च्या घराखाली गुप्त गुहा आढळून आली आहे. याची माहिती तिने स्वत:चे मित्र अन् शिक्षकांना दिली. मग या सर्वांनी या गुहेत प्रवेश करत तेथे काय आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला. अनेक शतकांपूर्वीची ही गुहा असल्याचे मानले जात आहे. ब्रिटनच्या नॉटिंगम येथे हा प्रकार घडला आहे. येथे मिळालेली गुहा 1800 च्या दशकातील असू शकते, ज्याचा वापर घरगुती तळघराच्या स्वरुपात होत असावा असे तज्ञांचे मानणे आहे.
घराच्या परिसरात नवी इमर्जन्सी लाइट लावत असताना ही 200 वर्षांहून अधिक जुनी गुहा आढळून आली आहे. गुहेविषयी समजल्यावर सर्व विद्यार्थी त्यात शिरले, तेथे त्यांना एक पूर्ण नवा फ्लोअर दिसून आला, त्यांना सर्व भिंतींना कापून तयार करण्यात आलेली बेंच आढळून आली, यामुळे याचा वापर भोजन तसेच पेयपदार्थांचा साठा करण्यासाठी कपाटाच्या स्वरुपात केला जात असावा असा निष्कर्ष काढण्यात आला आहे.

या गुहेचा रोमांचक शोध भीतीच्या वातावरणात झाल्याचे नॉटिंगम ट्रेंट युनिव्हर्सिटीच्या ब्रॉडकास्ट जर्नालिझमची विद्यार्थिनी स्टेफनी बेनेटने सांगितले आहे. या घरात राहायला येण्यापूर्वी तिला या गुहेविषयी कुठलीच माहिती नव्हती. ही काही खूप मोठी गुहा नाही, सुमारे 6 फूट लांब आणि 4 फुट रुंद आहे. परंतु हे सर्वकाही अत्यंत रोमांचक होते. आम्हा सर्वांना तेथे एकत्र जावे लागले, कारण तेथे काय मिळेल याची भीती आम्हाला वाटत होती. ही गुहा खुली ठेवण्याचा आमचा विचार आहे, कारण घरात एक गुहा असणे चांगली बाब आहे. आम्ही याचा वापर कसा करणार हे अद्याप ठरविले नसल्याचे स्टेफनीने सांगितले आहे.
स्टेफनी आणि तिच्या मित्रांनी स्थानिक पुरातत्वतज्ञांशी संपर्क साधला होता. ही गुहा सुमारे 200 वर्षांपूर्वी तयार केली असावी. गुहा एका घराच्या तळघराच्या स्वरुपात वापरली जात असावी. यावरील इमारत ही 19 व्या शतकातील असू शकते. अशाप्रकारच्या गुहेचे हे एक चांगले उदाहरण आहे. परंतु ही गुहा आकारात लहान आहे. शहरातील अन्य गुहांपेक्षा ती वेगळी असल्याचे विधान नॉटिंगम सिटी कौन्सिलचे पुरातत्वतज्ञ स्कॉट लोमॅक्स यांनी केले आहे.









