हायस्कुलमध्ये शिकणाऱ्या मुलीची मोठी कामगिरी
हायस्कुलमध्ये शिकणाऱ्या मुलीला उत्तर इस्रायलमध्ये उत्खननादरम्यान एक प्राचीन आरसा मिळाला आहे. हा आरसा सुमारे 1500 वर्षे जुना असल्याचे सांगण्यात येत आहे. वाईट नजरेपासून वाचविण्यासाठी या आरशाचा वापर केला जात होता असे सांगण्यात येत आहे. मुलीने इस्रायल पुरातत्व अवशेष प्राधिकरणाकडून केल्या जाणाऱ्या उत्खनात भाग घेतला होता. काही दिवसांपूर्वी हाइफा येथे राहणाऱ्या 17 वर्षीय अवीव वीजमॅनने उषा नावाच्या प्राचीन स्थळावरील उत्खननात भाग घेतला होता. अवीवने बीजान्टिन काळातील आरशाचा शोध लावला आहे. उषा ठिकाणाला ओशा या नावानेही ओळखले जाते. हे गलीलमध्ये एक ज्यू गाव होते. रोमन साम्राज्याच्या अत्याचारापासून वाचून रब्बींकडून (ज्यूंशी निगडित एक शब्द) स्थापन शहराचे अवशेष अलिकडेच मिळाले आहेत. शिक्षण मंत्रालयाच्या एका कार्यक्रमाच्या अंतर्गत 500 विद्यार्थ्यांनी या उत्खननात भाग घेतला. यादरम्यान विद्यार्थ्यांनी माउंट मेरोनपासून माउंट हर्मनपर्यंत 90 किलोमीटरच्या ट्रेकवर काम केले आहे.

मातीच्या भांड्याचे तुकडे हस्तगत
विद्यार्थ्यांनी देशभरातील प्राचीन स्थळांवर इस्रायल पुरातन प्राधिकरणाच्या उत्खननात भाग घेतला. या स्थळांना भविष्यात जनतेसाठी खुले केले जाणार आहे. याच स्थानांपैकी एक किर्यत अतानजीकचे उषा स्थळ आहे. येथील उत्खननाचे निर्देशन इस्रायल पुरातन प्राधिकरणाचे पुरातत्व तज्ञ हाना अबू उक्सा अबूद यांनी केले होते.
चालू आठवड्यात उत्खननात विशेष शोध लागला. एका मातीच्या भांड्याचे तुकडे येथे सापडले आहेत. इमारतीच्या भिंतीदरम्यान दिसून आलेला हा तुकडा अवीवने उचलला आणि इस्रायल पुरातन प्राधिकरणाच्या साउथर्न एज्युकेशन सेंटरचे संचालक डॉक्टर इनाट अंबर-आर्मोन यांना दाखविला, ज्यांनी याला एक जादुई आरसा ठरविले आहे. हा तुकडा 4-6 व्या शतकातील बिजान्टिन काळातील एका जादुई आरशाचा हिस्सा होता. वाईट नजरांपासून सुरक्षेसाठी प्लेटदरम्यान एका काचेचा आरसा ठेवला जात होता. यामुळे वाईट आत्मा म्हणजेच राक्षसापासून वाचता येत होते असे मानले जात होते. अशाच प्रकारे आरसे भूतकाळात अंत्यसंस्कारावेळी ठेवले जात होते, जेणेकरून दुसऱ्या जगाच्या प्रवासात संबंधिताची रक्षा होऊ शकेल अशी माहिती पुरातन अवशेष प्राधिकरणाचे क्यूरेटर नेविट पोपोविच यांनी दिली.









