पत्त्यांचा वापर करत नेंदविला विश्वविक्रम
पत्त्यांद्वारे विश्वविक्रम नोंदविता येऊ शकतो असे तुम्हाला कधी वाटले आहे का? कोलकात्यात राहणारा 15 वर्षीय अर्णव डागाने ही कामगिरी करून दाखविली आहे. या पत्त्यांद्वारे त्याने जगातील सर्वात मोठे प्लेइंग कार्ड स्ट्रक्चर तयार केले आहे. हे स्ट्रचर त्याने कुठल्याही गोंद किंवा टेपच्या मदतीशिवाय निर्माण केले आहे. या कामाकरता प्रचंड कौशल्य लागते. अर्णवने स्वत:च्या स्ट्रक्चरमध्ये अनेक ऐतिहासिक इमारती, सॉल्ट लेक स्टेडियम आणि सेंट पॉल कॅथेड्रल देखील साकारले आहे.
अर्णवचे नाव गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नेंद झाले आहे. त्याल चार प्रतिष्ठित इमारतींचे स्ट्रक्चर तयार करण्यास 41 दिवस लागले आहेत. सुमारे 1 लाख 43 हजार पत्त्यांच्या मदतीने त्याने हे तयार केले आहे. स्ट्रक्चरची लांबी 40 फूट तर उंची 11 फूट 4 इंच तर रुंदी 16 फूट 8 इंच इतकी होती. या कामगिरीसोबतच अर्णवने ब्रायन बर्गचा मागील विश्वक्रम मोडीत काढला आहे.
ब्रायनने मकाओच्या तीन हॉटेल्सच्या स्ट्रक्चरला प्लेइंग कार्डच्या मदतीने तयार केले होते. त्या स्ट्रक्चरची लांबी 34 फूट एक इंच होती. तर रुंदी 11 फूट आणि 7 इंच इतकी होती. हे काम सोपे नव्हते, याकरता मला वास्तुकलेचे अध्यक्ष करावे लागले आणि त्याची वैशिष्ट्यो जाणून घ्यावी लागली आहेत. तसेच या वास्तूंबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी प्रत्यक्ष जाऊन पाहणी करावी लागली. मग स्वत:च्या कार्ड चिटेक्टरसाठी उपयुक्त जागेची गरज होती. या जागेचा शोध घेतल्यावरच हे काम हाती घेता आल्याचे अर्णवने सांगितले आहे.









