पांढऱया अन् गुलाबी रंगाचा मासा पाहून लोक दंग
अमेरिकेच्या टेनेसीमध्ये एका 15 वर्षीय मुलाने पकडलेला मासा पाहून प्रत्येक जण थक्क होतेय. एडवर्ड्स तरुमियांज स्वतःच्या मित्रांसोबत एका फिशिंग ट्रिपवर गेला होत. तेथे जे काही घडले ते पाहून त्याचाच विश्वास बसला नाही. हा मासा ब्ल्यू कॅटफिश असून तो पांढऱया तसेच गुलाबी रंगाचा आहे. याच्या तोंडाकडे गुलाबी रंग दिसून येतो. मासा खूपच मोठा आहे. हा मासा टेनेसी नदीत मिळाला असून यावरील गुलाबी रंग अलबिनीज्म किंवा ल्यूसिज्ममुळे असल्याचे सांगण्यात येत आहे.
अलबीनिज्ममध्ये त्वचा आणि केसांचा रंग बिघडत असतो. हा आजार प्राण्यांमध्ये अधिक प्रमाणात आढळतो. तर ल्यूसिज्मच्या स्थितीत कुठल्याही प्राण्याचा चेहरा पिवळा होतो किंवा त्याच्या चेहऱयावर चट्टे येऊ लागतात. कॅप्टन सिम्स यांनी एडवर्ड्स आणि त्याच्या या माशाचे छायाचित्र फेसबुकवर शेअर केले आहे. 30 वर्षांमध्ये पहिल्यांदाच माझ्या नौकेवर एखादा अलबिनो मासा आल्याचे त्यांनी म्हटले आहे.

माशाचा हा गुलाबी रंग त्याच्या धमन्यांमुळे असून त्या त्वचेतून दिसून येतात. ल्यूसिज्मममध्ये प्राण्यांच्या त्वचेचा रंग फिकट होतो. हा मासा खरोखरच असाधारण असल्याचे टेनेसी वाईल्डलाइफ रिसोर्स एजेन्सीने म्हटले आहे. एडवर्ड्सने पकडलेला मासा काही वेळानंतर पुन्हा नदीत सोडून दिला.
जगभरात सध्या 20 हजार लोकांमागे एक व्यक्ती अलबिनीज्मने पीडित आहे. माणूस आणि प्राणी दोघांमध्येही लाल किंवा गुलाबी रंगाच्या ओठांद्वारे या आजाराची ओळख पटविली जाते. हा आजार पक्षी, साप आणि सस्तन प्राण्यांमध्येही आढळून येतो.









