कणकवली :
खेळण्याच्या नादात ‘शेणाच्या गायरी’त भरलेल्या पाण्यात बुडून श्वेत समीर होळकर (वय दोन वर्षे, एक महिना) या हुंबरट येथील बालकाचा मृत्यू झाला. ही घटना हुंबरट येथे गुरुवारी दुपारी 2.30 च्या सुमारास घडली. श्वेत हा खेळत-खेळत गायरीकडे गेला व त्यात पडला. काही वेळाने कुणाच्या तरी हे निदर्शनास आले. श्वेतला बाहेर काढण्यात आले, त्यावेळी तो बेशुद्धावस्थेत होता. त्याला तात्काळ फोंडाघाट प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. मात्र, तत्पूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता. घटना समजताच पोलीस निरीक्षक अजमुद्दीन मुल्ला, सहाय्यक उपनिरीक्षक व्ही. एम. चव्हाण घटनास्थळी दाखल झाले होते.









