बेंगळूर/प्रतिनिधी
कर्नाटकचे मुख्यमंत्री बदलणे अशक्य असून मुख्यमंत्री म्हणून बी. एस. येडियुरप्पा उर्वरित कार्यकाळ पूर्ण करतील, असे गोकक भाजपचे आमदार रमेश जारकिहोळी यांनी सांगितले.
जारकिहोळी यांनी गुरुवारी गोकक येथे पत्रकारांना सांगितले की येडियुरप्पा यांच्या नेतृत्वात भाजप आगामी विधानसभा निवडणुका लढवेल. “येडियुरप्पा आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावर विश्वास ठेवून आम्ही भाजपमध्ये सामील झालो आहे,” असे जारकिहोळी म्हणाले.
येडियुरप्पा यांच्याविरोधात काही आमदारांनी उपस्थित केलेल्या असंतोषाला उत्तर देताना ते म्हणाले की, भाजपाचे सर्व आमदार कुटुंबातील आहेत. ते म्हणाले, “येडियुरप्पा यांनी या सर्वांशी बोलावे, असे ते म्हणाले. जारकिहोळी यांनी, “आम्ही १८ जूननंतर नवीन येडियुरप्पा पाहू, जे राज्यभरात जाऊन काम करतील,” असे ते म्हणाले. दरम्यान “मंत्री सी. पी. योगेश्वर अजूनही माझे मित्र आहेत आणि त्यांच्यात काही गैरसमज असल्यास त्यांनी येडियुरप्पा यांच्याशी बोलले पाहिजे,” असे जारकिहोळी म्हणाले.